कोरोना काळात निवृत्त पोलिसांना घरे रिकामी करण्याची नोटीस; न्याय मिळवून देण्याची फडणवीसांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 18:11 IST2021-06-24T18:10:57+5:302021-06-24T18:11:32+5:30
सेवानिवृत्त पोलीस आणि कुटुंबीय हवालदील.

कोरोना काळात निवृत्त पोलिसांना घरे रिकामी करण्याची नोटीस; न्याय मिळवून देण्याची फडणवीसांकडे मागणी
मुंबई : वरळी, शिवडी, नायगाव आणि डिलाईल रोड येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलिसांना सरकारी घरे खाली करण्याच्या नोटीसा पोलीस खात्याने दिल्या आहेत. एकीकडे कोरोना काळातच घरे खाली करण्याच्या नोटीसा दिल्याने सेवानिवृत्त पोलीस आणि त्यांचे कुटुंब हवालदिल झाले आहेत.
याप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सेवानिवृत्त पोलिसांना न्याय मिळवून द्यावा मागणी बोरीवलीचे भाजपा आमदार सुनील राणे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सदर प्रकरणी आमदार सुनील राणे यांनी फडणवीस यांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि निवेदन दिले.
फडणवीस मुख्यमंत्री असतांना सेवानिवृत्त पोलिसांच्या घरांबाबत सहानभूतीने निर्णय घेऊन आणि न्यायालयात शपथ पत्र सादर करून त्यांची घरे खाली करण्यास स्थगिती दिली होती अशी आठवण यावेळी आमदार सुनील राणे यांनी करून दिली.