तीन महिन्यांचे एकदाच नव्हे, दरमहा मिळेल धान्य; छगन भुजबळ यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 01:33 AM2020-04-02T01:33:58+5:302020-04-02T06:30:29+5:30

दर महिन्याला प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय

Not just once every three months, you will get grain every month; Information about Chhagan Bhujbal | तीन महिन्यांचे एकदाच नव्हे, दरमहा मिळेल धान्य; छगन भुजबळ यांची माहिती

तीन महिन्यांचे एकदाच नव्हे, दरमहा मिळेल धान्य; छगन भुजबळ यांची माहिती

googlenewsNext

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानांमधून पुढील तीन महिन्यांसाठी प्रति महिना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र राज्यात एकाच वेळी तीन महिन्यांचा तांदूळ मोफत मिळणार नाही, तर तो दर महिन्याला देण्यात येणार आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज स्पष्ट केले.

राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तांदुळ वाटप केला जाईल. राज्यातील रेशन दुकानांमधून एप्रिल आणि मे सोबत जूनचे धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने १९ मार्चला घेतला होता. केंद्र शासनाकडून ३० मार्चला एप्रिल ते जून २०२० दरम्यान नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती ५ किलो अतिरिक्त तांदुळ मोफत देण्याची अधिकृत सूचना प्राप्त झाली आहे.

तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदुळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधा वाटप दुकानांमध्ये साठवणूक करणे जिकीरीचे होईल. ही बाब रेशन दुकानदार संघटनांकडून शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली. तसेच केंद्र सरकारने ३० मार्च रोजी मोफत तांदुळ देण्याच्या निर्णय घेतल्यामुळे दोन दिवसांत धान्याची वाहतूक करण्यासाठी मयार्दा असल्यामुळे त्या-त्या महिन्यामध्ये, धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे भुजबळ यांनी सांगितले.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर,त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची केंद्रसरकारची सूचना आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला त्याने नियमित अन्न धान्याची खरेदी केल्यानंतर,प्रती व्यक्ती ५ किलो तांदुळ त्या त्या महिन्यात मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Web Title: Not just once every three months, you will get grain every month; Information about Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.