'माझ्या ट्विटचा वेगळा अर्थ...; 'त्या' ट्विटवर आमदार सत्यजीत तांबेंच स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 01:45 PM2023-02-15T13:45:17+5:302023-02-15T13:50:41+5:30

विधान परिषद निवडणुकांपासून सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे. तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली व यात ते विजयी झाली.

No reason to interpret my tweet differently says MLA Satyajit Tambe | 'माझ्या ट्विटचा वेगळा अर्थ...; 'त्या' ट्विटवर आमदार सत्यजीत तांबेंच स्पष्टीकरण

'माझ्या ट्विटचा वेगळा अर्थ...; 'त्या' ट्विटवर आमदार सत्यजीत तांबेंच स्पष्टीकरण

googlenewsNext

Satyajeet Tambe News: विधान परिषद निवडणुकांपासून सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे. तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली व यात ते विजयी झाली. आमदार तांबे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काल सत्यजीत तांबे यांनी एका ट्विटमध्ये कविता शेअर केली होती. या कवितेवरुन तांबे आता काँग्रेसमध्ये परतणार नसल्याची चर्चा सुरू आहे. आता यावर स्वत: सत्यजीत तांबे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.     

काल तांबेंनी केलेल्या एका ट्विटमध्ये नवीन चर्चा सुरू झाली होती. सत्यजित तांबे प्रकरणावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट नाना पटोले यांचा तर दुसरा गट बाळासाहेब थोरात यांचा. यातच, बाळासाहेब थोरातांनी सत्यजित तांबे यांच्या निलंबनावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर तांबे यांनी ट्विट केले की, "उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…नजरेत सदा नवी दिशा असावी। घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही…क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी।" असे सूचक ट्विट तांबे यांनी केले आहे, यावरुन ते भाजपमध्ये प्रवेश करणार का अशा चर्चा सुरू होत्या. यावर आता तांबे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

Satyajeet Tambe : 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी...', सत्यजित तांबे यांचे ट्विट चर्चेत

मी एका शाळेच्या स्नेहसंमेनाला गेलो होतो, त्या ठिकाणी एका मुलाने ही कविता वाचून दाखवली ती कविता मला आवडली म्हणून मी ट्विट केली. यातून कोणताही अर्थ काढण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया आमदार  सत्यजीत तांबे यांनी दिली. 

'मी नाशिक विधान परिषद मतदार संघातून विजयी झालो. आता सध्या मी सर्व जनतेचे आभार मानण्यासाठी फिरत आहे. मला काम करण्यासाठी संधी दिली आहे,  असंही तांबे म्हणाले. 

Web Title: No reason to interpret my tweet differently says MLA Satyajit Tambe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.