Join us  

मोदी-शहांना अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 3:01 PM

राज ठाकरेंकडून मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांना लग्नाचं आमंत्रण

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या चिरंजीव अमित ठाकरे यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. राज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस, भाजपामधील अनेक दिग्गजांना लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच राज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लग्नाची पत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. मात्र या लग्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांना निमंत्रण देण्यात येणार नसल्याची माहिती मिळते आहे. येत्या 27 जानेवारीला अमित ठाकरे विवाह बंधनात अडकणार आहेत. मिताली बोरुडेसोबत त्यांचा विवाह होणार आहे. या सोहळ्यासाठी राज यांनी अनेक राजकीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. याशिवाय उद्योग आणि चित्रपट विश्वातील अनेकांना राज ठाकरे निमंत्रित करणार आहेत. उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना राज यांनी लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. तर राज ठाकरेंच्या सचिवांकडून दिल्लीतील अनेक नेत्यांना निमंत्रणं देण्यात आली. त्यासाठी राज यांचे दोन सचिव 6 जानेवारीला दिल्लीला रवाना झाले. त्यांनी दोन दिवसांमध्ये अनेक बड्या नेत्यांना निमंत्रणं दिली. मात्र त्यात मोदी आणि शहा यांचा समावेश नव्हता. राज यांच्या सचिवांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपातील अनेक नेते आणि मंत्री, खासदारांना निमंत्रणं दिली. याआधी नाशिक दौऱ्यावरून यांनी राज यांनी मोदींना लग्नाला आमंत्रित करणार नसल्याचे संकेत दिले होते. अमित ठाकरेंच्या लग्नाला मोदींना बोलावणार का, असा प्रश्न पत्रकारांनी राज यांना विचारला होता. त्यावर त्यांचा लग्न व्यवस्थेवर विश्वास आहे का?, असा प्रतिप्रश्न राज यांनी केला होता.  

टॅग्स :अमित ठाकरेराज ठाकरेमनसेनरेंद्र मोदीअमित शाहभाजपा