The nitrogen tank in the lab exploded and part of the building collapsed, woman injured | लॅबमधील नायट्रोजनच्या टँकचा स्फोट होऊन इमारतीचा काही भाग कोसळला, महिला जखमी

लॅबमधील नायट्रोजनच्या टँकचा स्फोट होऊन इमारतीचा काही भाग कोसळला, महिला जखमी

मुंबई - लॅबमध्ये ठेवण्यात आलेल्या लिक्विड नायट्रोजन टँकचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत इमारतीचा काही भाग कोसळला असून, या दुर्घटनेमध्ये एक महिला जखमी झाली आहे. मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या जुन्या पासपोर्ट कार्यालयाजवळच्या सेंच्युरी बिल्डिंगचा भाग या दुर्घटनेत कोसळला. दरम्यान, या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुचित रश्मी कौर असे या जखमी महिलेचे नाव आहे. 

English summary :
The nitrogen tank in the lab exploded and part of the building collapsed, woman injured

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The nitrogen tank in the lab exploded and part of the building collapsed, woman injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.