Join us  

Nitin Raut : '... तेव्हाही भारत दरिद्रीच होता, फक्त इथले राजे-महाराजे श्रीमंत होते'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 3:40 PM

Nitin Raut : जगात सर्वाधिक सोनं अंगावर वागवणारा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. पूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत होता, असेही आपण वारंवार ऐकत, वाचत आलो आहोत. प्राचीन संस्कृतिकाळात सोनं या धातूला सन्मान प्राप्त होता

ठळक मुद्देराज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये, आपण याच्याशी सहमत नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. 

मुंबई - भारत देशावर इंग्रजांनी राज्य करण्यापूर्वी भारत हा श्रीमंत देश होता, असे नेहमीच सांगितले जाते. आई-आजीच्या गोष्टीतून किंवा कथा-कादंबऱ्यातील पुस्तकांच्या धड्यांतून आपण एक वाक्य नेहमी ऐकतो, ते म्हणजे भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. मात्र, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये, आपण याच्याशी सहमत नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. 

जगात सर्वाधिक सोनं अंगावर वागवणारा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. पूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत होता, असेही आपण वारंवार ऐकत, वाचत आलो आहोत. प्राचीन संस्कृतिकाळात सोनं या धातूला सन्मान प्राप्त होता. इसवी सनाच्या २५०० वर्षांपूर्वीच्या मोहेंजोदारो व हड़प्पा येथे भग्नावस्थेत मिळालेल्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषांवरून स्वर्णाचा उपयोग आभूषणांसाठी केला जात होता, असे दिसते. त्या काळात दक्षिण भारताच्या म्हैसूर प्रदेशातून हा धातू प्राप्त होत होता. राजे महाराजे सोन्याची आभूषणे वापरत, महाराणींना सोन्याने मढवले जाई, अशा कित्येक कथाही आपण वाचतो किंवा टेलिव्हीजन माध्यमांमधून पाहत असतो. याच अनुषंगाने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. इंग्रज भारतात येण्यापूर्वीचा भारतही गरीबच होता, असे त्यांनी म्हटलंय. त्यांच्या ट्विट करण्यामागचा स्पष्ट हेतू साध्य होत नाही. मात्र, या ट्विटरवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 

इंग्रजांची सत्ता येण्याआधी भारत खूप श्रीमंत होता हे एक थोतांड आहे. भारत दरिद्रीच होता, फक्त इथले राजे-महाराजे श्रीमंत होते असं माझं मत आहे, असे नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. त्यावर, अनेकांनी कमेंट करुन आजही भारत गरिबच आहे, केवळ येथील नेतेमंडळी श्रीमंत आहे, अशा शब्दात त्यांना प्रत्युत्तर दिलंय. 

टॅग्स :नितीन राऊतसोनंभारतकाँग्रेसमंत्री