येत्या तीन दिवसांत जोर‘धार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 05:48 IST2018-08-24T05:47:50+5:302018-08-24T05:48:15+5:30

मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने आता शनिवार, रविवार आणि सोमवारसाठी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा दिला आहे.

In the next three days, | येत्या तीन दिवसांत जोर‘धार’

येत्या तीन दिवसांत जोर‘धार’

मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने आता शनिवार, रविवार आणि सोमवारसाठी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा दिला आहे. २४ आॅगस्ट रोजी मात्र उत्तर कोकणाला इशारा देण्यात आलेला नाही. दरम्यान, गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर ऊन-पावसाचा खेळ रंगला होता. पूर्व आणि पश्चिम उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५, २६ आणि २७ आॅगस्ट रोजी उत्तर कोकणात म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

Web Title: In the next three days,