A new sign to the deprived Bahujan front, the assembly will contest on this gas cylender. prakash ambedkar | आयोगाकडून वंचित बहुजन आघाडीला नवं 'चिन्ह', विधानसभा 'या' चिन्हावर लढणार
आयोगाकडून वंचित बहुजन आघाडीला नवं 'चिन्ह', विधानसभा 'या' चिन्हावर लढणार

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकांवेळी कपबशी या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला आता निवडणूक आयोगाकडून चिन्ह देण्यात आलं आहे.

मुंबई - वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकांवेळी राज्यात धुमाकूळ घातला होता. राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात आपला उमेदवार उभा करुन बहुतांश मते मिळविण्यात वंचित बहुजन आघाडीला यश आले आहे. तर, अनेक ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांची डोकेदुखी ठरण्याचं काम वंचितने केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने वंचितने तयारी सुरू केली आहे. 

लोकसभा निवडणुकांवेळी कपबशी या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला आता निवडणूक आयोगाकडून चिन्ह देण्यात आलं आहे. आघाडीने वंचितला गॅस सिलेंडर हे चिन्हे दिले आहे. तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशिन हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये वंचितचे चिन्ह गॅस सिलेंडर हे असणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बहुतांश पराभवाला वंचित बहुजन आघाडी कारणीभूत ठरली आहे. त्यामुळेच, वंचित बहुजन आघाडीला भाजपाची बी टीम म्हणूनही हिनवले जाते. बहुजन भारिप महासंघाचे प्रमुख बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाशी हातमिळवणी केल्यानंतर वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थापन केला. अगदी थोड्यात कालावधीत या पक्षाने राज्यात आपलं मोठं नाव केलं आहे. तर, आता विधानसभा निवडणुकांची तयारीही सुरू केली आहे.  
 


Web Title: A new sign to the deprived Bahujan front, the assembly will contest on this gas cylender. prakash ambedkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.