Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून राज्यात नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता; आज मंत्रिमंडळाची होणार बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 12:16 IST

आज दुपारी चार वाजता मंत्रिमंडळाच्या बैठक होणार आहे.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकार हळूहळू कोरोनामुळे लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. याचदरम्यान राज्यात मास्कमुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र मास्कमुक्तीचा विचार अद्याप केला नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील महाराष्ट्र पुर्णपणे निर्बंध मुक्त होणार का? यावरही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच तसेच उद्यापासून नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 

आज दुपारी चार वाजता मंत्रिमंडळाच्या बैठक होणार आहे. बैठकीनंतर रात्रीपर्यंत गुढीपाडव्या संबंधातील नियमावली, विशेषतः शोभायात्रांना परवानगी द्यायची की नाही, याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं अजित पवारांनी सांगितलं.  

दरम्यान, टास्क फोर्स व विविध संस्था या क्षेत्रात सातत्याने काम करत असतात. जगात, देशात काय चाललंय, प्रतिबंधक योजनांबाबत मार्गदर्शन करत असतं. निर्बंधांसंदर्भात मागण्या येतात. आम्ही टास्क फोर्सपर्यंत या मागण्या पोहोचवतो आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेत असतो. गुढीपाडव्याबद्दलचा निर्णयही त्यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

रेल्वेमधील निर्बंध लसीकरण वाढावं म्हणून कायम ठेवले आहे.  रेल्वे, बस, मॉलमधील शिथीलकरणाबाबत टास्क फोर्सची चर्चा करून निर्णय घेण्यात येणार सल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले, परदेशात कोरोनाचा धोका वाढतोय, ज्या नागरिकांनी लस घेतली नसेल त्यांनी घ्यावी,  तसेच मास्कमुक्तीचा सध्यातरी सरकारचा विचार नाही, तसेच मास्कमुक्तीचं धारिष्ट्य करणं तुर्त केलेले नाही, असे राजेश टोपे म्हणाले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअजित पवारउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार