पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 06:33 IST2025-08-04T06:33:17+5:302025-08-04T06:33:17+5:30

या समितीत तीन अधिकाऱ्यांचा समावेश असून ते विविध राज्यांमधील पीयूसी दर, नियम व तपासणी प्रक्रियेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नव्याने दर निश्चित केले जाणार आहेत.

New rates for PUC soon, Transport Department forms committee to study various states | पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन

पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन


मुंबई : महाराष्ट्रात वाहनाचे प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याच्या प्रमाणपत्राचे (पीयूसी) दर सुधारण्यासाठी परिवहन विभागाने समिती स्थापन केली आहे. त्यामुळे आता पीयूसीसाठी आकारले जाणारे दर आता बदलण्याची शक्यता आहे. या समितीत तीन अधिकाऱ्यांचा समावेश असून ते विविध राज्यांमधील पीयूसी दर, नियम व तपासणी प्रक्रियेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नव्याने दर निश्चित केले जाणार आहेत.

सध्या राज्यात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि जड वाहनांच्या पीयूसी तपासणीसाठी वेगवेगळे दर आकारले जातात. राज्यातील पीयूसी प्रमाणपत्राचे दर २०२२मध्ये बदलण्यात आले होते.  तंत्रज्ञानात झालेल्या बदलामुळे तपासणी प्रक्रिया अधिक आधुनिक झाली असली, तरी दर अद्याप जुन्याच पद्धतीने आकारले जात आहेत. आता ४ वर्षांनंतर नवीन दर लागू करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

नवीन दर निश्चित करताना वाहन प्रकार, इंधन प्रकार, तपासणीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचा मेहनताना आदींचा विचार केला जाईल. समितीचा अहवाल परिवहन आयुक्तांकडे सादर झाल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले. नवीन दर राज्यभरात एकसमान लागू केले जातील.

सध्याचे दर 
दुचाकी वाहन    ५० 
पेट्रोलवरील तीन चाकी    १०० 
पेट्रोल, सीएनजी,     १२५
एलपीजी चारचाकी 
डिझेल चारचाकी    १५० 

प्रदूषण नियंत्रणासाठीही एमएमआरमध्ये समिती नियुक्त
मुंबई महानगर प्रदेशात वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी निवृत्त मुख्य सचिव श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीच्या माध्यमातून एमएमआरमध्ये जुन्या, तसेच डिझेल आणि पेट्रोल वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना करण्याच्या दृष्टीने ही समिती अहवाल तयार करणार आहे.

Web Title: New rates for PUC soon, Transport Department forms committee to study various states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.