Neeraj Chopra: यंदाच्या गणेशोत्सवात अवतरणार नीरज चोप्राच्या रूपातील बाप्पा, मराठमोळ्या कलाकाराने साकारली सुबक मूर्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 09:03 PM2021-09-07T21:03:49+5:302021-09-07T21:07:46+5:30

Neeraj Chopra, Ganesh Idol: शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एका मराठमोळ्या कलाकाराने नीरज चोप्राचा कलेच्या माध्यमातून आगळावेगळा सन्मान केला आहे.

Neeraj Chopra: In this year's Ganeshotsav, Bappa in the form of Neeraj Chopra, a beautiful idol made by a Marathi artist | Neeraj Chopra: यंदाच्या गणेशोत्सवात अवतरणार नीरज चोप्राच्या रूपातील बाप्पा, मराठमोळ्या कलाकाराने साकारली सुबक मूर्ती 

Neeraj Chopra: यंदाच्या गणेशोत्सवात अवतरणार नीरज चोप्राच्या रूपातील बाप्पा, मराठमोळ्या कलाकाराने साकारली सुबक मूर्ती 

Next

मुंबई - गेल्या महिन्यात आटोपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटूंनी जबरदस्त कामगिरी केली होती. दरम्यान, भालाफेकपटू नीरज चोप्राने जगभरातील दिग्गजांना मागे टाकत सुवर्णपदकावर नाव कोरून ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीवर सोन्याचा कळस चढवला होता. (Neeraj Chopra) तेव्हापासून नीरज चोप्रा हा भारतीय क्रीडाविश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच विविध ठिकाणी त्याच्या कौतुकासाठी सत्कार सोहळे सुरू आहेत. (Ganesh Idol) दरम्यान, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एका मराठमोळ्या कलाकाराने नीरज चोप्राचा कलेच्या माध्यमातून आगळावेगळा सन्मान केला आहे. (In this year's Ganeshotsav, Bappa is came in Neeraj Chopras look, a beautiful idol made by a Marathi artist)

या मूर्तीकाराने नीरज चोप्राच्या भालाधारी रूपामध्ये गणेशमूर्ती साकारली आहे. कोकणातील मूर्तीकार आशिश संसारे यांनी ही सुबक गणेशमूर्ती साकारली आहे.  उल्लेखनीय बाब म्हणजे ही गणेशमूर्ती मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या निवासस्थानी विराजमान होणार आहे. डॉ. देशमुख हे दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर आधारित गणेशमूर्ती चतुर्थीला घरी आणतात. दरम्यान, यावर्षी त्यांनी ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आपल्या गणेशमूर्तीसाठी निवडला. त्यानंतर त्यांनी सुचवलेल्या कल्पनेनुसार आशिष संसारे यांनी ही गणेशमूर्ती साकारली आहे. 
ही गणेशमूर्ती द्विभूज असून, ती नीरजप्रमाणे भालाफेक करताच्या मुद्रेमध्ये आहे. ही मूर्ती शाडू मातीपासून साकारण्यात आली असून, ती सुमारे दीड फूट ऊंचीची आहे. सर्वसामान्यपणे हाती पाश, अंकुश आदी शस्त्रे घेतलेल्या रूपात दिसणारा बाप्पा, भलाफेक करताना दिसत आहे. 

दरम्यान, भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीमध्ये सुवर्णपदक जिंकून देणारा नीयज चोप्रा सध्या यूथ आयकॉन बनला आहे. त्यामुळे सध्या तो जिथे जातो तिथे फॅन्सची गर्दी दिसून येत आहे. नीरज चोप्राभोवती प्रसिद्धीचे वलय निर्माण झाल्याने तो पापाराझींचाही आवडता स्टार बनला बनला आहे. नीरज चोप्रा सध्या मुंबईमध्ये आहे. तिथे तो एका पॉश रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आला असताना पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तो या रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावर त्याच्या भोवती पापाराझी आणि फॅन्सचा गराडा पडला. नीरजने गुलाबी रंगाचे शर्ट, काळी पँट आणि काळ्या रंगाची टोपी परिधान केली होती. या लूकमध्ये तो खूप स्टायलीश दिसत होता. 

Web Title: Neeraj Chopra: In this year's Ganeshotsav, Bappa in the form of Neeraj Chopra, a beautiful idol made by a Marathi artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app