मुंबई जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा भाजपाला मोठा धक्का, प्रसाद लाड पराभूत, सिद्धार्थ कांबळे विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:55 IST2022-01-13T17:57:43+5:302022-01-13T18:55:41+5:30
Mumbai District Co-operative Bank: आज झालेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ कांबळे यांनी भाजपाचे उमेदवाप प्रसाद लाड यांना पराभूत करत अध्यक्षपद पटकावले. हा पराभव भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा भाजपाला मोठा धक्का, प्रसाद लाड पराभूत, सिद्धार्थ कांबळे विजयी
मुंबई - मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षीय निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भारपाचा धक्कादायकरीत्या पराभव केला आहे. आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ कांबळे यांनी भाजपाचे उमेदवाप प्रसाद लाड यांना पराभूत करत अध्यक्षपद पटकावले. हा पराभव भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
गेली अनेक वर्षे बॅंकेची प्रवीण दरेकर यांच्याकडे सूत्रे होती. मात्र त्यांचा मजूर म्हणून बॅंकेवर निवडून येण्याचा फंडा यंदा वादात सापडला होता. त्यामुळे दुसऱ्या मतदार संघातून ते संचालक पदी म्हणून निवडून आले. संचालकांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, असे एकूण ११ संचालक होते. भाजपकडे ९ संचालक होते. त्यामुळे आज होणारी अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवडणूक कमालीची चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, प्रवीण दरेकर यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने युती करत व्यूहरचना आखली. सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार, युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर व सुरज चव्हाण यांनी दोन तास चर्चा झाली. दरम्यान, अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 9 मते मिळाली. उपाध्यक्ष पदाची निवडणूक चुरशीची झाली. शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांना 10 मते आणि भाजपच्या विठ्ठल भोसले यांना 10 मते मिळाली. गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यावेळी भोसले यांच्या नावाची चिठ्ठी आल्याने निवडणूक आयोगाने त्यांना उपाध्यक्ष पद घोषीत केले. भाजपचे विष्णू भोंगळे यांनी ऐनवेळी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडीला अध्यक्षपदासाठी मतदान दिले. त्यामुळे भाजपला पराभवाचा धक्का बसला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत समसमान मते पडली.
दरम्यान आज झालेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांना पराभवाचा धक्का बसला. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत भाजपाचे प्रसाद लाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांच्यात सामना झाला. यामध्ये प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली. तर सिद्धार्थ कांबळे यांना ११ मते मिळाली. अशा प्रकारे सिद्धार्थ कांबळे यांचा दोन मतांनी विजय झाला.
भाजपकडे 10 मते होती, विष्णू भुंबरे हे फुटले. त्यामुळे महाविकास आघाडीला 11 मते मिळाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्य सरकारने दबाव आणला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष लक्ष घातल्याने मोठा दबाव निर्माण केला. सत्तेचा दुरुपयोग करुन ही निवडणूक महाविकास आघाडीने जिंकल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.