राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवार यांना सुप्रिया सुळेंचा मोलाचा सल्ला; म्हणाल्या, “बारामती...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 16:44 IST2026-03-05T16:41:45+5:302026-03-05T16:44:36+5:30

Supirya Sule News: शरद पवार यांनी मला दिलेला सल्ला पार्थला आत्या म्हणून देते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

ncp sp group mp supriya sule valuable advice to parth pawar who is candidate to rajya sabha election 2026 | राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवार यांना सुप्रिया सुळेंचा मोलाचा सल्ला; म्हणाल्या, “बारामती...”

राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवार यांना सुप्रिया सुळेंचा मोलाचा सल्ला; म्हणाल्या, “बारामती...”

Supirya Sule News: महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत आणि भाजपाचे सहकार्य यातून ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले. राज्यातील राज्यसभेच्या सातही जागांची निवडणूक बिनविरोध होणार हेही निश्चित झाले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवार यांना मोलाचा सल्ला दिल्याचे म्हटले जात आहे.

काँग्रेस आणि उद्धवसेना या दोन्ही मित्र पक्षांनी शरद पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने तसेच भाजपाने पाचवा उमेदवार न दिल्याने सात जागांसाठी प्रमुख सात उमेदवार रिंगणात असतील. त्यामुळे वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर जाणार आहेत. या निमित्ताने साठ वर्षांच्या त्यांच्या सांसदीय कारकिर्दीला आणखी सहा वर्षाची जोड मिळणार आहे.

शरद पवार यांनी मला सल्ला दिला, तोच पार्थला देते...

लोकसभा आणि राज्यसभेत कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचे. जेव्हा बोलायची वेळ येईल त्यावेळी अभ्यासपूर्ण बोलायचे. कारण त्या ठिकाणी बसलेला व्यक्ती आपल्यापेक्षा ज्ञानी असतो आणि देश आपल्याकडे बघत असतो. संसदेची पायरी चढतो ती संधी फक्त आणि फक्त बारातमती लोकसभा मतदारसंघामुळे मिळाली आहे. जोपर्यंत त्यांच्या भावनेशी प्रामाणिक राहशील तोपर्यंत ही पायरी चढत राहशील असा सल्ला मला शरद पवारांनी दिला होता. तोच सल्ला मी पार्थला, एक आत्या म्हणून देते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भाजपा पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी देतानाच भाजपाने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा प्रत्यय देत माजी आमदार रामराव वडकुते (हिंगोली) व नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांनाही राज्यसभेची संधी दिली आहे.

 

Web Title: ncp sp group mp supriya sule valuable advice to parth pawar who is candidate to rajya sabha election 2026