ncp leader spoke person mahesh tapase criticize devendra fadnavis delhi metro photo tweeted asked about mumbai metro 3 | "देवेंद्रजी, मुंबई मेट्रो -३ मध्ये तुम्हाला फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळणार"; राष्ट्रवादीचा टोला

"देवेंद्रजी, मुंबई मेट्रो -३ मध्ये तुम्हाला फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळणार"; राष्ट्रवादीचा टोला

ठळक मुद्देमुंबई मेट्रो ३ मधून विमानतळापर्यंत असा प्रवास कधी करायला मिळेल, फडणवीस यांचा सवालसरकार मुंबई मेट्रो - ३ लवकरच सुरू करेल, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांचं वक्तव्य

बुधवारी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोतील फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केले होते. "मी मेट्रो-३ या मार्गाने विमातळापर्यंत असा प्रवास कधी करू शकेन," असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला चिमटा काढला होता. दरम्यान यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना टोला लगावला आहे.

"मुंबई मेट्रो - ३ हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल यात शंका नाही परंतु केंद्राकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे अशी मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना फोटो काढून ट्वीट करण्याची व फिरण्याची संधी मिळावी ही मुंबईकरांची अपेक्षा आहे." असा टोला राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

"महाविकास आघाडी सरकार मुंबई मेट्रो - ३ लवकरच सुरू करेल आणि ती पूर्ण करण्यासाठी कटिबद्धही आहे. परंतु वारंवार केंद्राकडून मदतीऐवजी आडकाठी होत आहे. त्यामुळे केंद्रासोबत आपण समन्वय केलात तर प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकेल आणि मुंबईकरांना दिलासा मिळू शकेल असंही तपासे म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ncp leader spoke person mahesh tapase criticize devendra fadnavis delhi metro photo tweeted asked about mumbai metro 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.