शिवसेना-वंचित युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अंधारात; अजित पवार उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 06:16 AM2023-01-25T06:16:27+5:302023-01-25T06:16:48+5:30

मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करू व त्यानंतर आमची भूमिका मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

NCP Congress not aware about Shiv Sena vanchit alliance Ajit Pawar will discuss with Uddhav Thackeray | शिवसेना-वंचित युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अंधारात; अजित पवार उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार

शिवसेना-वंचित युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अंधारात; अजित पवार उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार

googlenewsNext

मुंबई :  

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून समजल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले. यासंदर्भात मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करू व त्यानंतर आमची भूमिका मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कोट्यातून कुणाला मित्रपक्ष म्हणून सोबत घ्यायचे, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले की, राजकारणात मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या याला काही अर्थ नसतो. राजकारणात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आराखडे आखावे लागतात व राजकीय भूमिका मांडावी लागते. युती- आघाडी होते, त्यावेळी ‘मागचे झाले गेले गंगेला मिळाले’ असे समजून पुढे गेलो तरच योग्य गोष्टी घडतात.

शिवसेना आणि वंचितच्या युतीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजी नाट्य सुरू झाल्याची चर्चा आहे. ही युती जाहीर करताना उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा केली नसल्याचे अजित पवार यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे.

Web Title: NCP Congress not aware about Shiv Sena vanchit alliance Ajit Pawar will discuss with Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.