Amit Ghavate एनसीबीला समीर वानखेडेंचा उत्तराधिकारी मिळाला, मुंबईच्या झोनल डायरेक्टरपदी अमित गवाटेंची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 12:31 IST2022-04-14T10:36:59+5:302022-04-14T12:31:41+5:30
Amit Gawate NCB: एनसीबीच्या मुंबई झोनल डायरेक्टर पदासाठी समीर वानखेडे Sameer Wankhede यांचा उत्तराधिकारी एनसीबीला मिळाला आहे. आयआरएस अधिकारी अमित गवाटे यांची एनसीबीच्या विभागीय संचालकपदासाठी निवड करण्यात आली आहे.

Amit Ghavate एनसीबीला समीर वानखेडेंचा उत्तराधिकारी मिळाला, मुंबईच्या झोनल डायरेक्टरपदी अमित गवाटेंची नियुक्ती
मुंबई - एनसीबीचे मुंबईतील माजी विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede यांची कारकीर्द अनेक कारणांनी गाजली होती. तसेच आर्यन खान प्रकरणात आरोप झाल्याने समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान, मुदत संपल्यानंतर समीर वानखेडेंची बदली झाली होती. तेव्हापासून या पदाचा कार्यभार अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे होता. मात्र आता एनसीबीच्या मुंबई झोनल डायरेक्टर पदासाठी समीर वानखेडे यांचा उत्तराधिकारी एनसीबीला मिळाला आहे. आयआरएस अधिकारी अमित गवाटे यांची एनसीबीच्या विभागीय संचालकपदासाठी निवड करण्यात आली आहे.
अमित गवाटे हे २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते यापूर्वी एनसीबीचे बंगळुरूमधील विभागीय संचालक म्हणून काम पाहत होते. तसेच त्यांच्याकडे चेन्नईचा अतिरिक्त प्रभार होता. समीर वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ संपल्यावर त्यांना मुदतवाढ देण्यात आली नव्हती. तेव्हापासून आता चर्चेत राहिलेल्या एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदी कुणाची निवड होणार याबाबत उत्सुकता होती. अखेर या पदावर अमित गवाटे यांची निवड करण्यात आली.
एनसीबीचे विभागीय संचालक असताना समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाया चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्यादरम्यान, मुंबईजवळ एका आलिशान क्रूझवर झालेली कारवाई आणि त्यात आर्यन खान याला झालेली अटक यामुळे मोठा वाद झाला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्याविरोधात मोठी आघाडी उघडली होती. नवाब मलिकांच्या बेछूट आरोपांमुळे समीर वानखेडे आणि एनसीबी अडचणीत आले होते.