Join us

Nawab Malik : नवाब मलिकांची प्रकृती गंभीर, स्ट्रेचरवरून दाखल केले जे. जे. रुग्णालयात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 16:40 IST

Nawab malik Unwell, Admitted in J J hospital :मलिक तीन दिवसांपासून खूप आजारी असल्याची माहिती नवाब मलिक यांच्या वकिलांनी विशेष पीएमएलए कोर्टात दिली.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून आज त्यांना स्ट्रेचरवरून जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलिक तीन दिवसांपासून खूप आजारी असल्याची माहिती नवाब मलिक यांच्या वकिलांनी विशेष पीएमएलए कोर्टात दिली.

वकिलांनी मलिक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली. फरार गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने फेब्रुवारीमध्ये मलिकला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार अटक केली होती. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या वकिलाने विशेष न्यायालयाला माहिती दिली आहे की, मलिक गेल्या 3 दिवसांपासून आजारी आहेत आणि आता त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांना व्हीलचेअर/स्ट्रेचरवरून नेण्यात आले आहे. ६२ वर्षीय मलिक यांनी यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते की, किडनीच्या आजारामुळे ते आजारी आहेत आणि पायांना सूज आली आहे.

४० पोलीस घरात घुसले, बहीण आवाज देत राहिली'; वाचवा, कुणाला तरी फोन करा...

याआधी शुक्रवारी, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारण्यास नकार दिला होता. तर पीएमएलए न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी ६ मे पर्यंत वाढवली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्याअंतर्गत उच्च न्यायालयाने त्यांच्या तात्काळ सुटकेचा अंतरिम अर्ज फेटाळला. ईडी मलिक यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे.

टॅग्स :नवाब मलिकउच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालयअंमलबजावणी संचालनालयजे. जे. रुग्णालय