Nawab Malik: मलिकांना दिलासा नाहीच, कोर्टाकडून 22 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 02:59 PM2022-04-18T14:59:44+5:302022-04-18T15:00:57+5:30

न्यायालयाच्या आदेशानुसार मलिक यांना कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Nawab Malik:Nawab Malik is not relieved, the court remanded him to judicial custody till April 22 | Nawab Malik: मलिकांना दिलासा नाहीच, कोर्टाकडून 22 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

Nawab Malik: मलिकांना दिलासा नाहीच, कोर्टाकडून 22 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

googlenewsNext

मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आता 22 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी त्यांना 18 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे, मलिक यांना आणखी 10 दिवस कोठडीतच राहावे लागणार आहे. 

न्यायालयाच्या आदेशानुसार मलिक यांना कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसंच त्यांना घरचं जेवण आणि औषधं घेण्यासही न्यायालयाने परवानगी दिली आहे. ईडीने 23 फेब्रुवारीला मलिक यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. यामध्ये त्यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर मलिकांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर, 18 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. आता, पुन्हा एकदा मलिकांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

दरम्यान, उच्च रक्तदाब व मधुमेह असल्याने कमी मीठ असलेले घरचे जेवण मिळावे, अशा विनंतीचाही अर्ज करण्यात आला होता. त्यावर मलिक यांचा वैद्यकीय अहवाल पाहून त्यांना औषधं आणि घरगुती जेवण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) पुन्हा एकदा दणका देत, मलिक यांच्या 8 मालमत्तांवर टाच आणली आहे. त्यात कुर्ला, वांद्रेतील मालमत्तांसह उस्मानाबादच्या 148 एकर जमिनीचा समावेश आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीकडून ‘या’ मालमत्ता जप्त 
- कुर्ला येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील तीन एकरमध्ये पसरलेेल्या गवालिया कंपाउंडसह कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा
- तीन फ्लॅट्स आणि वांद्रे पश्चिमेतील दोन फ्लॅट्स
- उस्मानाबाद जिल्ह्यामधील १४८ एकर जमीन 

सुप्रीम कोर्टात धाव
ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करीत नोंदवलेला गुन्हा आणि पीएमएलए न्यायालयाच्या आदेशाला नवाब मलिक यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. हायकोर्टाकडून दिलासा न मिळाल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मलिक सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.
 

Web Title: Nawab Malik:Nawab Malik is not relieved, the court remanded him to judicial custody till April 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.