नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 06:30 IST2025-06-05T06:29:40+5:302025-06-05T06:30:16+5:30

प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाशांची अगोदरच सुखरूप सुटका करण्यात आली.

Navi Mumbai bus catches fire in Andheri; Passengers rescued safely; Short circuit suspected | नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय

नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ऐरोली ते अंधेरीदरम्यान धावणाऱ्या नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या बस मार्ग नंबर १४४ च्या इलेक्ट्रिक बसला अंधेरी पूर्वेतील मरोळ बस डेपोनजीक बुधवारी सायंकाळी अचानक आग लागली. या घटनेत बस जळून खाक झाली. मात्र, प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाशांची अगोदरच सुखरूप सुटका करण्यात आली.

बस अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी रोड, मरोळ बस डेपो येथून प्रवाशांना घेऊन जात असताना  अचानकपणे आग लागली. ही आग शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आग लागताच बसचालक आणि वाहक यांनी तत्काळ बस सुरक्षित ठिकाणी उभी केली. या आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी ६:१२ वाजता आग विझविण्यात अग्निशमन दलास यश आले. रस्त्यातच बसला लागलेल्या या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

Web Title: Navi Mumbai bus catches fire in Andheri; Passengers rescued safely; Short circuit suspected