Nashik Oxygen Leak: हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 04:09 PM2021-04-21T16:09:30+5:302021-04-21T16:23:33+5:30

Nashik Oxygen Leak: एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो.

Nashik Oxygen Leak: How to comfort grandchildren? How to wipe away their tears, mourned by the Chief Minister uddhav thackeray | Nashik Oxygen Leak: हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Nashik Oxygen Leak: हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

googlenewsNext
ठळक मुद्देहे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो

मुंबई - नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनं महराष्ट्र हळहळला असून मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे. “कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे, अशी प्रतिक्रियी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी दिली.  

एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना दुसरीकडे नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. या घटनेनंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शोक व्यक्त केला. तर, चंद्रकांत पाटील यांनीही घटनेच्या सखोल चौकशीही मागणी केली आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही चौकशी होणारच, असे स्पष्टीकरण दिलंय. तसेच, या घटनेचे कोणीही राजकारण करू नये, असेही ते म्हणाले. 

नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

चंद्रकांत पाटील म्हणतात

नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली घटना प्रचंड धक्का देणारी आणि ह्रदयद्रावक आहे. ऑक्सिजन टाकीला गळती लागून आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही आठवी घटना आहे. कुठं शॉर्ट सर्कीट होतं, कुठं लहान मुलांच्या हॉस्पीटलमध्ये मुलं दगावतात. तातडीने या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. रुग्णालयातील इतर रुग्णांच्या शिफ्टींगचं काम सुरक्षितपणे व्हायला हवं. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

देवेंद्र फडणवीसांची मागणी

नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. नाशिकमध्ये जे घडले ते भयंकर आहे. या दुर्घटनेत 11 लोक मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती असून हे अतिशय वेदनादायी आहे. सद्यस्थितीत रुग्णालयातील इतर रुग्णांच्या मदतीसाठी प्राधान्य देण्यात याावे, गरज पडल्यास त्यांना इतरत्र हलवावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, या दुर्घटनेच्या सखोल चौकशीची मागणीही फडणवीस यांनी केली आहे. 

Web Title: Nashik Oxygen Leak: How to comfort grandchildren? How to wipe away their tears, mourned by the Chief Minister uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.