Maharashtra Election 2019: मुंबईच्या मुख्य समन्वयकपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरेंद्र वर्मा यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 22:14 IST2019-10-08T20:33:26+5:302019-10-08T22:14:29+5:30
Maharashtra Election 2019: मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचार- प्रसार व नियोजन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून समन्वय समित्यांचे गठन करण्यात आले आहे.

Maharashtra Election 2019: मुंबईच्या मुख्य समन्वयकपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरेंद्र वर्मा यांची नियुक्ती
मुंबई: मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचार-प्रसार व नियोजन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून समन्वय समित्यांचे गठन करण्यात आले आहे. समितीच्या पक्षाचे राष्ट्रीय सचिव व राष्ट्रीय प्रवक्ते व स्टार प्रचारक नरेंद्र वर्मा यांची मुख्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबई जिल्हा,दक्षिण मध्य मुंबई जिल्हा,उत्तर मध्य मुंबई जिल्हा,उत्तर पूर्व मुंबई जिल्हा,उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा व उत्तर मुंबई जिल्हा अश्या विभागवार समित्या पक्षाने नियुक्त केल्या आहेत. समितीची पहिली बैठक येत्या बुधवार दि,10 रोजी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्या लयात होणार असल्याची माहिती नरेंद्र वर्मा यांनी दिली.
समन्वय समिती प्रमुख व सदस्यांनी एनसीपी व संयुक्त पुरोगामी आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांशी संपर्क साधून समन्वयाद्वारे अडचणी सोडवणे, प्रचार सभेचे नियोजन करून त्यादृष्टीने तात्काळ काम सुरू करणे असे या समितीची जबाबदारी असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी शेवटी दिली.