Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशाचा तुरुंग करणारेच आता मोदी, RSSच्या नावाने जनतेला घाबरवताहेत!; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 13:12 IST

एकेकाळी संपूर्ण देशाला तुरुंगशाळा करणारेच आता मोदी आणि आरएसएसच्या नावाने जनतेला घाबरवण्याचे काम करत आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.

ठळक मुद्देलोकशाही, संविधानप्रती आस्था असायला हवी. आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश तुरुंगशाळा केलाआणीबाणी आणि महाभियोग ही कॉंग्रसची मानसिकता

मुंबई : एकेकाळी संपूर्ण देशाला तुरुंगशाळा करणारेच आता मोदी आणि आरएसएसच्या नावाने जनतेला घाबरवण्याचे काम करत आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. मुंबई भाजपाने आयोजित केलेल्या आणीबाणीविरोधी दिनानिमित्त कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते. 

आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश तुरुंगशाळा केली. एका कुटुंबासाठी घटनेचा दुरुपयोग केला. स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे केले. आणीबाणी आणि महाभियोग ही कॉंग्रसची मानसिकता असून काँग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात आली, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. 

याचबरोबर, 400वरून 44वर आल्यानंतर त्यांना ईव्हीएम घोटाळा दिसत होता. मात्र, कर्नाटक निवडणुकीनंतर त्यांना ईव्हीएम घोटाळा आढळला नाही काय, असा टोला सुद्धा यावेळी नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला. यावेळी मंचावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार उपस्थित होते. 

आणीबाणीमध्ये सामन्य लोकांचे हक्क काढून घेतले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संविधान बदलले. त्यावेळी वृत्तपत्रांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. बातमीची आधी चाचपणी करूनच बातमी प्रसारित केली जायची. माझे वडील देखील दोन वर्ष जेलमध्ये यावेळी होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी यावेळी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...

- लोकशाही, संविधानप्रती आस्था असायला हवी. - आणीबाणी म्हणजे काय? सध्याच्या पिढीला माहीत नाही. - काळादिवस कॉंग्रेस विरोधासाठी नाही.- एका कुटुंबासाठी घटनेचा दुरुपयोग केला.- आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश तुरुंगशाळा केला.- स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे सुद्धा केले.- कॉंग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात आली. - आणीबाणी, महाभियोग ही कॉंग्रेसची मानसिकता.- गायक किशोर कुमार यांची काय चुका होती, त्यांच्या गाण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली. - कॉंग्रेस लोकशाहीचा विचार कधीच करत नाही.- भाजपा आणि संघाच्या नावाने लोकांना घाबरवण्याचं काम केलं जातय.- मीडियासाठी राजीव गांधी यांनी कोणता कायदा आणला होता ते सर्वांना माहिती आहे.- ज्या पक्षात लोकशाही नाही, ते काय संविधान वाचवणार?- आणीबाणीच्या काळात सगळे दहशतीखाली होतेय- आमच्या सरकारने संसदेत संविधान दिन साजरा केला .- 400 जागांवरून 44 जागा झाल्याने काँग्रेसचे निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.

टॅग्स :नरेंद्र मोदीइंदिरा गांधीकाँग्रेसराष्ट्रीय स्वयंसेवक संघभाजपाराजकारण