Join us

Narendra Giri Maharaj : उत्तर प्रदेशात कोणीतरी हिंदुत्त्वाचा गळा घोटला, शिवसेनेकडून CBI तपासाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 10:55 IST

नरेंद्र गिरी हे मोठे महंत होते, कुंभमेळा असो, अयोध्येचं आंदोलन असो या सगळ्या हिंदुत्वाच्या लढाईत महंतजी पुढे असत. अनेकदा त्यांची आणि आमची भेट झाली आहे. त्यांचे आशीर्वाद हिंदुत्त्ववादी संघटना म्हणून शिवसेनेला अनेकदा मिळाले आहेत.

ठळक मुद्दे नरेंद्र गिरी महाराजा मजबूत मनाचे होते, ते आत्महत्या करतील असे वाटत नाही. महाराजांच्या आत्महत्येच्या बातमीनं, उत्तर प्रदेशात कोणीतरी हिंदुत्त्वाचा गळा घोटल्याचंच क्षणभर आम्हाला वाटलं.

प्रयागराज - आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खांबावर लटकलेला अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराला सील केलं आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना 6-7 पानांची सुसाईड नोट मिळाली असून यात वादग्रस्त शिष्य आनंद गिरी यांचे नाव लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट करत सीबीआय तपासाची मागणी केली आहे

नरेंद्र गिरी हे मोठे महंत होते, कुंभमेळा असो, अयोध्येचं आंदोलन असो या सगळ्या हिंदुत्वाच्या लढाईत महंतजी पुढे असत. अनेकदा त्यांची आणि आमची भेट झाली आहे. त्यांचे आशीर्वाद हिंदुत्त्ववादी संघटना म्हणून शिवसेनेला अनेकदा मिळाले आहेत. ज्या पद्धतीने त्यांच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं ते रहस्यमय आहे. महाराजांचा मृत्यू रहस्यमय असून या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणीच शिवसेने नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. नरेंद्र गिरी महाराजा मजबूत मनाचे होते, ते आत्महत्या करतील असे वाटत नाही. महाराजांच्या आत्महत्येच्या बातमीनं, उत्तर प्रदेशात कोणीतरी हिंदुत्त्वाचा गळा घोटल्याचंच क्षणभर आम्हाला वाटलं. पालघरच्या साधूंच्या हत्येचा महाराष्ट्रात ज्याप्रमाणे नि:पक्षपातीपणे तपास झाला, त्याप्रमाणे हाही तपास व्हावा असेही राऊत यांनी म्हटले.  

शिष्य आनंद यांना ताब्यात घेतलं

पोलिसांनी शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यासोबतच, लेटे हनुमान मंदिराचे पुजारी आणि त्यांच्या मुलासही प्रयागराज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रयागराजच्या जॉर्ज टाऊनमध्ये याप्रकरणी आयपीसी 306 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी 11.30 वाजता महंत नरेंद्र गिरी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 

अखिलेश यादव यांनीही व्यक्त केलं दु:ख

मिळालेल्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांचा मठामध्येच मृत्यू झाला आहे. मठातील लोकांना त्यांची खोली आतून बंद असल्याची आढळली, त्यानंतर दार उघडले असता नरेंद्र गिरी यांचा मृतदेह खांबाला लटकलेला आढळला. दरम्यान, नरेंद्र गिरी यांच्या निधनाच्या वृत्ताने अयोध्येत शोककळा पसरली आहे. सपा नेते अखिलेश यादव यांनीही नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान, नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची माहिती पसरताच घटनास्थळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. पोलीस प्रत्येक अँगलने प्रकरणाचा तपास करणार आहेत.

बऱ्याच काळापासून तणावाखाली होते. 

महंत नरेंद्र गिरी बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती मिळत आहे. नरेंद्र गिरी यांचे त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांनी आनंद गिरींना मठातून बाहेर केले होते. पण, त्यानंतर आनंद गिरी यांनी माफी मागितल्यानंतर वाद मिटला होता. पण, दोघांमध्ये काही कारणावरुन वाद सुरू होता, अशीही माहिती मिळत आहे. 

इतर बातम्या : राजपेक्षा उद्धव चांगले लीडर आहेत असे मानणाऱ्या संजय राऊत यांचा ‘सिक्रेट भूतकाळ’!

टॅग्स :संजय राऊतनरेंद्र महाराजशिवसेनागुन्हेगारीउत्तर प्रदेश