'माझी जात ब्राह्मण असल्यानं माझ्यामाथी मारलं तर सर्व चालतं, असं काहींना वाटतं'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 07:37 PM2020-09-17T19:37:23+5:302020-09-17T19:38:10+5:30

''तुम्ही एखाद्याला कन्हीन्स करु शकत नसाल, तर त्यांना कन्फूज करा अशी थेअरी आपल्याकडे आहे. मी असं बोलू नये, पण काही लोकांना असं वाटतं की माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्यामाथी सर्व मारलं तर चालतं.

'Since my caste is Brahmin, if you hit me, everything will work, some people think', devendra fadnvis | 'माझी जात ब्राह्मण असल्यानं माझ्यामाथी मारलं तर सर्व चालतं, असं काहींना वाटतं'

'माझी जात ब्राह्मण असल्यानं माझ्यामाथी मारलं तर सर्व चालतं, असं काहींना वाटतं'

Next
ठळक मुद्दे''तुम्ही एखाद्याला कन्हीन्स करु शकत नसाल, तर त्यांना कन्फूज करा अशी थेअरी आपल्याकडे आहे. मी असं बोलू नये, पण काही लोकांना असं वाटतं की माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्यामाथी सर्व मारलं तर चालतं.

मुंबई-  सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीनंतर मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी, आम्ही मराठा समाजासोबत आहोत, सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबाच राहील, असे फडणवीस यांनी म्हटले. त्यानंतर, मराठा आरक्षणाविषयी आपलं मत मांडताना, मराठा समाजाला आणि राज्यातील लोकांना माहिती आहे, मराठा समाजासाठी मी काय केलंय. पण, काहींना वाटतं माझी जात ब्राह्मण आहे, मग माझ्यामाथी सर्वकाही चालतं, असे म्हणत फडणवीस यांनी गैरसमज पसरवणाऱ्यांबद्दल मत व्यक्त केला.  

''तुम्ही एखाद्याला कन्हीन्स करु शकत नसाल, तर त्यांना कन्फूज करा अशी थेअरी आपल्याकडे आहे. मी असं बोलू नये, पण काही लोकांना असं वाटतं की माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्यामाथी सर्व मारलं तर चालतं. काही लोकांकडून असा प्रयत्न नेहमीच केला जातो. पण, मराठा समाजाला आणि राज्यातील लोकांना हे माहिती आहे की समाजाच्या हितासाठी मी काय केलंय. हे असं चुकीच्या बातम्या पसरविण्याचं काम यशस्वी होणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

छत्रपती संभाजीराजे किंवा छत्रपती उदयनराजे भोसले यांपैकी कोणी मराठा समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करावे, याबद्दलच्या प्रश्नावर बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे, त्यांच्या वंशजांमध्ये कुणीही फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, दोघांनीही नेतृत्व करणं गरजेचं आहे. दोन्हीही नेते समजूतदार आहेत, वाद होणार नाही, कुणीही तसा प्रयत्न करू नये, असेही फडणवीस यांनी म्हटले.   

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्री सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावेळी, आम्ही मराठा समाजासोबत आहोत, मराठा समाजाचं आरक्षण बहाल करण्याकरता ज्या ज्या गोष्टी सरकार करेल, त्यास आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आम्ही यात कुठही राजकारण आणणार नाही. सरकार कुठे चुकत असेल तर सरकारला सांगू, पण पाठिंबा देऊ. जर, सरकारला वाटत असेल तर घटनापीठाकडे जावे, तर त्यासाठीही तत्काळ अर्ज करुन घटनापीठ स्थापित करुन आपण स्थगिती हटविण्याची मागणी केली पाहिजे. तसेच, इतर आरक्षणाच्या याचिकांसोबतच आमचीही अंतिम सुनावणी करा, अशी सरकारने भूमिका घेतली पाहिजे, तशी भूमिका सरकारची आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

सर्वपक्षीय बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण प्रकरणात सरकारला सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. 'सध्या मराठा समाजात भीतीचं वातावरण आहे. आम्ही राज्य सरकारला सहकार्य करणार आहोत,' असं फडणवीस म्हणाले. सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सारथी कमकुवत झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री म्हणाले आंदोलन नको

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानंमराठा आरक्षणाचा विषय मोठ्या घटनापीठाकडे सोपवला. मात्र त्याचवेळी आरक्षणाला स्थगितीही दिली. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. यातून कायदेशीर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय सर्व पक्षांनी मिळून घेतला होता. आताही सगळे पक्ष मराठा समाजाच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. विरोधकांनीदेखील सरकारला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे,' असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. सर्व पक्ष तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे आंदोलनं करू नका, असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं.
 

Web Title: 'Since my caste is Brahmin, if you hit me, everything will work, some people think', devendra fadnvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.