अश्लील चाळे करताना रोखल्याच्या रागातून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:50 IST2025-08-08T12:50:12+5:302025-08-08T12:50:25+5:30

याप्रकरणी दीपेश संदीप भोसले, सुमित अनिल सोनावणे आणि बटर उर्फ कार्तिक वाघमारे यांच्या विरोधात टिळकनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Murder in anger after being stopped while performing obscene acts | अश्लील चाळे करताना रोखल्याच्या रागातून हत्या

अश्लील चाळे करताना रोखल्याच्या रागातून हत्या


मुंबई : रिक्षामध्ये मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या दोघांना नागरिकांसह एका तरुणाने चोप दिला होता. त्याच रागातून या तरुणाची तिघांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) परिसरात घडली. जय उर्फ खुशाल गणेश शिंदे (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दीपेश संदीप भोसले, सुमित अनिल सोनावणे आणि बटर उर्फ कार्तिक वाघमारे यांच्या विरोधात टिळकनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. जयला राजावाडी रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पहाटे ३ वाजता झाला हल्ला
३० जुलै रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास दीपेश आणि सुमित हे दोघेही शेल कॉलनी, समाजमंदिर हॉलसमोर एका रिक्षामध्ये मैत्रिणींसोबत अश्लील चाळे करत होते. तेव्हा स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून चोप दिला होता. यावेळी जयनेही जाब विचारात  त्यांच्या कानाखाली लगावली होती. त्यानंतर ६ ऑगस्टला पहाटे ३ वाजता जय आपल्या मित्रासह दुचाकीवरून एलटीटी रेल्वेस्थानक परिसरात चहा पिण्यासाठी जात असताना एका वळणावर दीपेश, सुमित आणि साथीदाराने त्यांना गाठले. लोकांसमोर का मारले, असा जाब विचारत या तिघांनी जयला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दीपेशने चाकू जयच्या छातीत भोसकला. 

Web Title: Murder in anger after being stopped while performing obscene acts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.