विलगीकरणातील परदेशी प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे पथक; उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 09:49 PM2021-04-06T21:49:24+5:302021-04-06T21:51:35+5:30

यूके, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येते.

Municipal team to monitor foreign passengers in segregation; Legal action against violators | विलगीकरणातील परदेशी प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे पथक; उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

विलगीकरणातील परदेशी प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे पथक; उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

googlenewsNext

मुंबई - परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र काही प्रवासी विलगीकरण टाळण्यासाठी पळ काढत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे परदेशी प्रवाशांबाबत सुधारित कार्यपद्धती मंगळवारपासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार विलगीकरण करण्यात आलेल्या हॉटेलमध्ये प्रवाशांची तपासणी करण्यासाठी २४ विभाग कार्यालयांमध्ये पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

यूके, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येते. मात्र काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून परदेशी प्रवासी विमानतळावरून पळ काढत असल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत महापालिकेने मुंबई विमानतळावर प्रवासी उतरल्यापासून त्यांची पडताळणी करून त्यांना हॉटेलमध्ये पोहोचवेपर्यंत सुधारित नियमावली तयार केली आहे. त्यानुसार  विमानतळावर पथकाने दररोज आलेल्या प्रवाशांच्या संपूर्ण माहितीसह मुंबईतील २४ विभाग कार्यालयनिहाय यादी तयार करण्याची सूचना महापालिकेने केली आहे.

अशी आहे सुधारित नियमावली...

  • विमानतळावर तैनात पथकाने दररोज अशी विभागनिहाय प्रवाशांची यादी संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना ई-मेलने पाठवावी. 
  • विमानतळाबाहेर नियुक्त कर्मचाऱयांच्या पथकाने संबंधित प्रवाशांना त्यांनी निवडलेल्या हॉटेल्समध्ये बेस्ट बसेसद्वारे नेण्याची व्यवस्था करावी. 
  • संबंधित बसचालकाने प्रवाशांना हॉटेलमध्येच नेऊन सोडावे आणि संबंधित प्रवासी हॉटेलमध्ये पोहोचल्याबाबतची पावती त्या-त्या हॉटेलकडून घ्यावी. 
  •  विमानतळ समन्वय अधिकाऱयाने, प्रवासी आपापल्या हॉटेल्समध्ये पोहोचल्याबाबतच्या पावत्या आणि विमानतळाच्या आतील पथकाने बनविलेली प्रवाशांची यादी यांची फेरपडताळणी करुन सर्व प्रवासी हॉटेल्समध्ये पोहोचल्याबाबतची खातरजमा करावी. 
  • विभागातील सहाय्यक आयुक्तांनी, हॉटेलमध्ये विलगीकरणासाठी पाठवलेले प्रवाशी प्रत्यक्षात राहत असल्याची वेळोवेळी खातरजमा तपासणी पथकाद्वारे करावी. 
  • तपासणी पथकांनी प्रत्यक्ष विलगीकरण केंद्रांना किमान दोनवेळा भेट द्यावी. 
  • कोणत्याही नियमाचे उल्‍लंघन झाल्यास सहाय्यक आयुक्तांनी साथरोग नियंत्रण कायदानुसार कठोर कारवाई करावी.  

 

Web Title: Municipal team to monitor foreign passengers in segregation; Legal action against violators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.