मुंबईचा वडा पाव की नागपूरचे तर्री पोहे? ह्युमन इंटेलिजन्स की AI? देवेंद्र फडणवीसांची झटपट उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 07:42 PM2024-02-20T19:42:35+5:302024-02-20T19:56:07+5:30

Devendra Fadnavis Rapid Fire Q&A with Rishi Darda: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या अभ्यासपूर्ण उत्तरांसाठी ओळखले ...

Mumbai's Vada Pav or Nagpur's Tarri Pohe? Human Intelligence or AI? Devendra Fadnavis Quick Answers | मुंबईचा वडा पाव की नागपूरचे तर्री पोहे? ह्युमन इंटेलिजन्स की AI? देवेंद्र फडणवीसांची झटपट उत्तरं

मुंबईचा वडा पाव की नागपूरचे तर्री पोहे? ह्युमन इंटेलिजन्स की AI? देवेंद्र फडणवीसांची झटपट उत्तरं

Devendra Fadnavis Rapid Fire Q&A with Rishi Darda: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या अभ्यासपूर्ण उत्तरांसाठी ओळखले जातात. नुकतेच ‘टेक एंटरप्रेन्युअर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ या मुंबईत आयोजित झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. लोकमत मीडियाचे संपादकीय संचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईबाबतची नवी संकल्पना मांडली. यावेळी त्यांनी 'रॅपिड फायर राऊंड'मध्ये काही प्रश्नांची झटपट उत्तरे दिली.

प्रश्न- डिजीटल घड्याळ की पारंपरिक अनलॉग घड्याळ?
उत्तर- मी घड्याळ वापरतच नाही.

प्रश्न- अँड्रॉइड की iOS?
उत्तर- नक्कीच iOS म्हणजे आयफोन

प्रश्न- सर्वात टेक सॅव्ही म्हणजे तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारा नेता कोण?
उत्तर- पंतप्रधान नरेंद्र मोदी. कारण ते प्रत्येक नवे तंत्रज्ञान अतिशय अर्थपूर्ण पद्धतीने वापरतात.

प्रश्न- तुमच्या मते सर्वोत्तम बांधणी असलेला प्रकल्प कोणता? अटल सेतू, कोस्टल रोड की मुंबई मेट्रो?
उत्तर- खरं सांगायचं तर तीनही प्रकल्प सर्वोत्तम आहेत पण एकच निवडायचा असेल तर अटल सेतू.

प्रश्न- मुंबईचा वडा पाव की नागपूरचे तर्री पोहे?
उत्तर- नागपूरचे तर्री पोहे

प्रश्न- तुमच्या घरात सर्वात टेक-सॅव्ही कोण आहे? तुम्ही, तुमची पत्नी अमृताजी की मुलगी दिविजा?
उत्तर- दिविजा सर्वात जास्त टेक-सॅव्ही आहे. नवी पिढी ही तंत्रज्ञानासोबत जन्माला आली आहे. त्यामुळे मी देखील काही वेळी तिची मदत घेत असतो.

प्रश्न- दिविजा तुम्हाला कशाप्रकारे मदत करते?
उत्तर- माझ्या सोशल मीडियावर मी काय पोस्ट करावे, काय करू नये याबद्दलचा सल्ला ती मला नेहमी देते.

प्रश्न- तुम्ही नुकतंच वापरलेलं आणि तुम्हाला आवडलेलं एखादं नवीन टेक्नॉलॉजी-फ्रेंडली गॅझेट?
उत्तर- VR मशीन हे मला खूप आवडलं. व्हर्च्युअल रिअँलिटीचा अनुभव वेगळाच होता.

प्रश्न- मानवी बुद्धिमत्ता की कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)?
उत्तर- मानवी बुद्धिमत्ता कायमच सर्वोच्च असेल. कारण AI हे एक साधन आहे ज्याचा लगाम माणसाच्या हाती असतो. त्यामुळे तुम्ही हे साधन योग्य प्रकारे वापरलं तरच त्याचा उत्तम फायदा करून घेता येईल.

Web Title: Mumbai's Vada Pav or Nagpur's Tarri Pohe? Human Intelligence or AI? Devendra Fadnavis Quick Answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.