मुंबईतील उर्वरित दहा टक्के पाणी कपात २९ ऑगस्टपासून रद्द; तलाव क्षेत्रात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:54 IST2020-08-28T15:53:11+5:302020-08-28T15:54:47+5:30
आतापर्यंत तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे चार तलाव भरून वाहू लागले आहेत.

मुंबईतील उर्वरित दहा टक्के पाणी कपात २९ ऑगस्टपासून रद्द; तलाव क्षेत्रात दमदार पाऊस
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण ३४ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र गेल्या २५ दिवसांच्या कालावधीमध्ये तलाव क्षेत्रात दमदार पाऊस झाला. त्यामुळे आता सुमारे ९५ टक्के जलसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे.
आतापर्यंत तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे चार तलाव भरून वाहू लागले आहेत. तर मध्य वैतरणा आणि भातसा तलावही लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे.वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. २० पैकी दहा टक्के पाणीकपात २१ ऑगस्टपासून महापालिकेने मागे घेतली होती. त्यानंतर आता शनिवारी उर्वरित दहा टक्के पाणीकपात मागे घेण्यात येणार आहे.