Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपूनच वापरा! बीएमसीकडून दहा टक्के पाणी कपात, कोणत्या भागांना फटका बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:51 IST

Water Cut in Mumbai News: मुंबई महापालिकेकडून शहरातील काही भागांमध्ये दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काही दिवस काही वार्डांमध्ये यामुळे कमी पाणी पुरवठा होणार आहे. 

BMC Water Cut in Mumbai:मुंबईतील काही भागातील पाणी पुरवठ्यावर पुढील काही दिवस परिणाम होणार आहे. मुंबई महापालिकेने वार्षिक कामासाठी दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असून, २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत काही भागांना १० टक्के कमी पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. 

आजपासून (२७ जानेवारी) पाणी कपात सुरू झाली आहहे. मुंबई शहरातील काही विभाग आणि पूर्व उपनगरामधील ११ विभागांमध्ये पाणी कपातीची काही प्रमाण झळ बसणार आहे. 

मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमची वार्षिक पाहणी आणि दुरुस्ती केली जाणार आहे. त्या कामामुळे दहा टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. 

मुंबई शहरातील १२ विभागांमध्ये १० टक्के कमी पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून या भागातील नागरिकांना पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे पाण्याचा वापर व्यवस्थित करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. 

मुंबईतील कोणत्या भागांमध्ये दहा टक्के पाणी कपात?

-ए वार्डातील नेव्हल डॉकयार्ड भाग

- बी वार्डातील संपूर्ण परिसर

- सी वार्डामधील भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला परिसर

- ई वार्डातील संपूर्ण परिसर

- एफ दक्षिण वार्डातही संपूर्ण परिसरात १० टक्के पाणी कपात असणार आहे

- एफ उत्तर वार्डात संपर्ण परिसर

- टी वार्डातील मुलुंड पूर्व आणि पश्चिम भाग

- एस वार्डातील भांडुप, नाहूर, कांजूर मार्ग आणि विक्रोळी पूर्व परिसर

- एन वार्डातील विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर परिसर

- एल वार्डातील कुर्ला पूर्व परिसर 

- एम वार्डातील संपूर्ण परिसर

- एम पश्चिम वार्डातील संपूर्ण भाग

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai faces 10% water cut; use water wisely!

Web Summary : Mumbai residents, conserve water! BMC announces a 10% water cut from January 27th to February 7th for maintenance. Several areas across the city and eastern suburbs will experience reduced water supply. Affected residents are urged to use water judiciously during this period.
टॅग्स :पाणी कपातमुंबई महानगरपालिकापाणी टंचाईमुंबईपाणी