Mumbaikars got rid of year-round water tension | मुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले

मुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. तलाव क्षेत्रात तब्बल १२ हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा होईल एवढा जलसाठा आता तलावांमध्ये आहे.
जुलै अखेरीस तलाव क्षेत्रात केवळ ३४ टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने महापालिकेने ५ आॅगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू केली. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने मुंबईसह तलाव क्षेत्रात चांगलाच जोर धरला. सर्व तलाव काठोकाठ भरल्यामुळे पालिका प्रशासनाने आॅगस्टअखेरीस २० टक्के पाणीकपात मागे घेतली.
वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तलाव क्षेत्रात १४ लाख ३० हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला. आतापर्यंत तुळशी, विहार, मोडकसागर, तानसा हे तलाव भरून वाहिले. तर अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा काठोकाठ भरले.


जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)
तलाव कमाल किमान उपयुक्त साठा सध्या
(दशलक्ष)
मोडक सागर १६३.१५ १४३.२६ १२८९१० १६३.१४
तानसा १२८.६३ ११८.८७ १४३२९९ १२८.५४
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.५८
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.५२
अप्पर ६०३.५१ ५९७.०२ २२५११९ ६०३.४५
वैतरणा
भातसा १४२.०७ १०४.९० ७०७९८३ १४१.७४
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १८९०९६ २८४.१५

२३ सप्टेंबर
रोजी तलावांमध्ये
जलसाठा
वर्ष जलसाठा टक्के
(दशलक्ष
लीटर)
२०२० १४३०१५२ ९८.८१
२०१९ १४२६९९५ ९८.५९
२०१८ १३५४८१० ९३.६१

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mumbaikars got rid of year-round water tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.