Join us

Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 11:25 IST

Mumbai Best Bus Video: मुंबईमध्ये गिरगाव मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बस जात असतानाच रस्त्याला मोठा खड्डा पडला. त्यामुळे बसचे मागील चाक खड्ड्यात अडकले आणि बस एका बाजूला झुकली. 

Mumbai Latest News: मुंबईतील गिरगावमधील ठाकूरद्वार परिसरात मोठी दुर्घटना टळली. गिरगाव मेट्रो स्टेशनजवळून बस जात असताना अचानक रस्ता खचून मोठा खड्डा पडला. यात बसचे मागील चाक अडकले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंबई मेट्रो ३ च्या कुलाबा ते वांद्रे या मार्गावर गिरगाव मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावरून बस जात होती. त्यावेळी रस्ता खचला आणि बसचे मागील बाजूचे चाक पाच फूट खोल खड्ड्यात गेले.

वाचा >>विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!

अचानक बस एका बाजूला झुकली गेल्याने प्रवासी घाबरले. त्यानंतर सर्तकता बाळगत सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.   बस खड्ड्यात अडकल्याचा व्हिडीओ

बॅकबे डेपोची १२१ बस मार्गावरील बस आज (१६ जून) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अडकल्याची माहिती मिळाली आहे. सदर बसमधील कोणत्याही प्रवाशांना ईजा झालेली नाही. बस खाजगी कंत्राटदार मेसेज टाटाची असल्याने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना बस तातडीने खड्ड्यातून बाहेर काढण्याच्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

यापूर्वीही याच परिसरात एक दुर्घटना घडली होती. मेट्रोचे काम सुरू असताना एक अवजड क्रेन कोसळले होते. त्यामुळे तीन दिवस हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. या मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. बस खड्ड्यात अडकल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. 

टॅग्स :बेस्टव्हायरल व्हिडिओमेट्रोअपघात