Mumbai: लग्नाच्या दोन महिन्यानंतरच सासरच्या लोकांनी दाखवला खरा रंग, कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 14:38 IST2025-07-22T14:36:07+5:302025-07-22T14:38:23+5:30
Mumbai Crime: सासरी होत असलेल्या छळाला वैतागून विवाहित महिलेने राहत्या घरात आत्महत्या केली.

Mumbai: लग्नाच्या दोन महिन्यानंतरच सासरच्या लोकांनी दाखवला खरा रंग, कंटाळून विवाहितेची आत्महत्या
सासरी होत असलेल्या छळाला वैतागून विवाहित महिलेने राहत्या घरात आत्महत्या केली. मुंबई येथील वर्सोवा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी मृत महिलेचा पती आणि सासूवर छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. मृत महिलेची आई शकुंतला शांताराम हगवणे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
छाया सचिन बच्चे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. छायाचे २०२२ मध्ये लग्न झाले. परंतु, लग्नाच्या दोन महिन्यानंतरच छायाच्या सासरच्या लोकांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली. शकुंतला यांनी सांगितले की, याआधीही छायाने २०२४ मध्ये सासरच्या सततच्या त्रासाला वैतागून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नैराश्यातून तिने स्वत:ला जखमी केले होते. त्यावेळी छायाचा पतीने सचिनने तिच्यावर घरीच उपचार केले. परंतु, काही दिवसानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाला, तेव्हा सचिन आणि त्याची आई सविता बच्चे यांनी तिला घराबाहेर काढले."
छायाच्या एकदिवस आधी छायाने शुंकतला यांना फोनकरून सचिन आणि सविताने तिला जीवे मारण्याची धमकी दिली, अशी माहिती दिली. दरम्यान, शुक्रवारी सचिनशी झालेल्या वादानंतर छायाने राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला ताबडतोब कपूर रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असे वृत्त आहे.
छायाच्या मृत्युची माहिती मिळताच हगवणे यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. वर्सोवा पोलिसांनी सचिन बच्चे आणि त्याची आई सविता बच्चे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि धमक्या देणे या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०८, ११५, ३(५), ३५२ आणि ८५ अंतर्गत हा खटला दाखल करण्यात आला.