चेंबूर: निर्माणाधीन मेट्रोचा पिलर रहिवाशी सोसायटीवर कोसळला; जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 08:55 IST2025-01-31T08:47:03+5:302025-01-31T08:55:01+5:30

Chembur Metro Pillar collapsed, Video : पिलर उभारण्यासाठी त्याभोवती स्टीलचा पिंजरा बांधण्यात आला होता

Mumbai Under construction metro pillar collapses in Chembur Suman Nagar no casualties reported | चेंबूर: निर्माणाधीन मेट्रोचा पिलर रहिवाशी सोसायटीवर कोसळला; जीवितहानी नाही

चेंबूर: निर्माणाधीन मेट्रोचा पिलर रहिवाशी सोसायटीवर कोसळला; जीवितहानी नाही

Chembur Metro Pillar collapsed, Video : मुंबईतीलचेंबूर येथे एका निवासी सोसायटीवर मुंबईमेट्रोचा पिलर कोसळल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. पिलर उभारण्यासाठी त्याभोवतीचा स्टीलचा पिंजरा बांधण्यात आला होता. निर्माणाधीन असलेल्या या पिलरच्या भोवतीचा स्टीलचा पिंजरा पडल्याने काही काळ भीतीचे वातावरण होते. ही घटना चेंबूरच्या सुमन नगर येथील भागात असल्याची माहिती मिळाली आहे. काँक्रीट स्लॅबला आधार देणारा स्टीलचा पिंजरा सुमन नगर येथील एका सोसायटीवर पडला. सायन ट्रॉम्बे रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली पण सुदैवाने कोणालाही इजा, दुखापत झाली नाही.

मेट्रोचा खांब उभारण्यासाठी सोसायटीजवळील २० फूट उंच खांबांचा आधार घेतला गेला होता अशी माहिती आहे. त्या खांबाच्या मदतीने मेट्रोच्या पिलरच्या भोवतीचा स्टीलचा पिंजरा उभारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Web Title: Mumbai Under construction metro pillar collapses in Chembur Suman Nagar no casualties reported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.