Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:28 IST2025-11-20T13:27:31+5:302025-11-20T13:28:55+5:30
Mumbai Kandivali Shoot: कांदिवली चारकोप येथे एका इस्टेट एजंटवर बुधवारी दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: कांदिवली चारकोप येथे एका इस्टेट एजंटवर बुधवारी दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. चारकोप पोलिस दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाचा शोध घेत आहेत. तर गोळीबारात जखमी झालेल्या एजंटवर उपचार सुरू आहेत. फ्रेडी डिलिमा असे त्यांचे नाव आहे.
चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ते चारकोप येथील फादर सुसाई इंग्रजी शाळेजवळ असलेल्या आपल्या मित्राच्या दुकानात डिलिमा गेले होते. दुुपारी २ च्या सुमारास तेथून बाहेर पडताच त्यांच्या मागावर असेलल्या तीन हल्लेखोरांपैकी एकाने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळीत्यांच्या पोटात घुसली. गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सर्वत्र तणावाचे निर्माण झाले होते. घटनेनंतर तात्काळ स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सीसीटीव्हीत हल्लेखोर कैद
गोळ्या झाडून तिघेही हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कुठून आले ते त्याचे चित्रण झाले आहे. त्याआधारे त्यांचा माग काढला जात आहे, अशी माहिती परिमंडळ ११चे पोलिस उपायुक्त संदीप जाधव यांनी दिली.
देशी कट्ट्याचा वापर
हल्लेखोरांनी देशी बनावटीच्या कट्ट्यातून गोळीबार केला. हल्लेखोरांनी हेल्मेट घातले होते. फ्रेडी यांचा कुणाशी वाद होता का? याबाबत पोलिस चौकशी सुरू आहे.