Mumbai, Thane, Konkan regions schools, colleges declared holiday after rain warning | अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर 19 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, कोकणातल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर 19 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, कोकणातल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबई : जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत देशासह राज्य आणि मुंबईला झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या मार्गाला लागला असून, प्रवासातही तो रौद्र स्वरूप धारण करणार आहे. 19 सप्टेंबरला राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे उद्या मुंबईसह उपनगरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यातील शाळा उद्या बंद राहणार आहेत.

 हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी पालघर, रायगड, जळगाव व सातारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. याच दिवशी कोल्हापुरात अतिवृष्टी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी मुंबई व ठाण्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. रायगड व पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, तर २० सप्टेंबर रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्रासह मध्य भारतात १८ ते २३ सप्टेंबर या काळात पावसाचा जोर वाढेल. उत्तर कोकणातही पावसाचा जोर वाढेल.

Web Title: Mumbai, Thane, Konkan regions schools, colleges declared holiday after rain warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.