Mumbai South Central Lok Sabha Result 2024: जिथं शिवसेना भवन तिथं ठाकरेंची मशाल! दक्षिण-मध्यमध्ये अनिल देसाईंचा विजय, राहुल शेवाळे पराभूत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 03:45 PM2024-06-04T15:45:45+5:302024-06-04T15:47:34+5:30

Mumbai South Central Lok Sabha Result 2024: दक्षिण-मध्य मुंबई मतदार संघात ठाकरे विरुद्ध शिंदे लढाईत ठाकरेंनी बाजी मारली आहे.

mumbai south central lok sabha result 2024 anil desai won by 53384 votes against rahul shewale maharashtra live result  | Mumbai South Central Lok Sabha Result 2024: जिथं शिवसेना भवन तिथं ठाकरेंची मशाल! दक्षिण-मध्यमध्ये अनिल देसाईंचा विजय, राहुल शेवाळे पराभूत 

Mumbai South Central Lok Sabha Result 2024: जिथं शिवसेना भवन तिथं ठाकरेंची मशाल! दक्षिण-मध्यमध्ये अनिल देसाईंचा विजय, राहुल शेवाळे पराभूत 

Mumbai South Central Lok Sabha Result 2024 : दक्षिण-मध्य मुंबई मतदार संघात ठाकरे विरुद्ध शिंदे लढाईत ठाकरेंनी बाजी मारली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई (Anil Desai) ५३,३८४ मतांनी विजयी झाली आहेत. दोन टर्म खासदार राहिलेल्या राहुल शेवाळेंना (Rahul Shewale) पराभवाचा धक्का बसला आहे.   

दक्षिण-मध्य मुंबईच्या अंतिम निकालात अनिल देसाई यांना ३ लाख ९५ हजार १३८ मतं मिळाली आहेत. तर राहुल शेवाळे यांना ३ लाख ४१ हजार ७५४ मतं मिळाली आहेत. दक्षिण मध्य मतदार संघातच शिवसेना भवन आहे आणि दादर परिसरात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे या मतदार संघात नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष होतं. 

अनिल देसाई पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरले होते आणि त्यांची लढत दोन टर्म खासदार राहिलेल्या राहुल शेवाळेंशी होती. यात अनिल देसाई यांनी जोरदार धक्का देत राहुल शेवाळेंना पराभवाची धूळ चारली आहे. शिवसेनेचा जन्म आणि वाढ जिथे झाली त्या दादर आणि माहीम परिसरात ठाकरेंचा उमेदवार विजयी झाल्यानं शिवसेना भवन परिसरात जोरदार जल्लोष केला जात आहे.

Web Title: mumbai south central lok sabha result 2024 anil desai won by 53384 votes against rahul shewale maharashtra live result 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.