Mumbai Rains Updates : मुंबईत कोसळधारा! शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ४ दरम्यान नोंदविला गेला सर्वाधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 02:31 PM2021-07-18T14:31:59+5:302021-07-18T14:39:12+5:30

Mumbai Rains Updates : रात्री ११ ते पहाटे ४ या साधारणपणे ५ तासांच्या कालावधी दरम्यान अनेक ठिकाणी तब्बल २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.

Mumbai Rains Updates heaviest rainfall was recorded between 11 pm on Saturday and 4 am on Sunday | Mumbai Rains Updates : मुंबईत कोसळधारा! शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ४ दरम्यान नोंदविला गेला सर्वाधिक पाऊस

Mumbai Rains Updates : मुंबईत कोसळधारा! शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ४ दरम्यान नोंदविला गेला सर्वाधिक पाऊस

Next

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शनिवार दिनांक १८ जुलै २०२१ च्या रात्रीपासून पावसाने जोर धरला. हा पाऊस पहाटे ४ वाजेपर्यंत सातत्याने सुरू होता. त्याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा, २४ विभाग कार्यालये, मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि २५ सहाय्यकारी नियंत्रण कक्ष, मुंबई अग्निशमन दल आदी सर्व यंत्रणा रात्रभर अव्याहतपणे कार्यरत होती. त्याचबरोबर महापालिकेची सर्व प्रमुख रूग्णालय आणि उपनगरीय रुग्णालये यांना देखील खबरदारीची उपाययोजना म्हणून आवश्यक त्या कार्यवाहीसाठी तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ६० ठिकाणी असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रांवर या पावसाची नियमित नोंद घेतली जात होती. स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे उपलब्ध होत असलेल्या पावसाच्या या आकडेवारीचे सातत्यपूर्ण विश्लेषण हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षामध्ये करण्यात येत होते व त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देखिल महापालिकेच्या विभाग कार्यालयांना रात्रभर नियमितपणे देण्यात येत होत्या.



रात्री ११ वाजेपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर पहाटे ४ वाजेनंतर कमी झाला. रात्री ११ ते पहाटे ४ या साधारणपणे ५ तासांच्या कालावधी दरम्यान अनेक ठिकाणी तब्बल २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यानुसार सर्वाधिक म्हणजे २२६.८२ मिलिमीटर इतका पाऊस हा 'आर उत्तर' विभाग क्षेत्रातील दहिसर अग्निशमन केंद्र येथे असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे नोंदविण्यात आला आहे. 

दहिसर खालोखाल चेंबूर परिसरात २१८.४५ मिलिमीटर, विक्रोळी पश्चिम परिसरात २११.०८ मिलिमीटर, कांदिवली परिसरात २०६.४९ मिलिमीटर, मरोळ परिसरात २०५.९९ मिलिमीटर, बोरिवली परिसरात २०२.६९ मिलिमीटर, किल्ला (फोर्ट) परिसरातील महापालिका  मुख्यालय येथे २०१.९३ मिलिमीटर आणि 'जी दक्षिण' विभाग परिसरात (वरळी) २००.४ मिलिमीटर इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे. उर्वरित स्वयंचलित हवामान केंद्रांवर देखील सदर ५ तासांच्या कालावधीदरम्यान १२५.७३ ते १९९.८६ इतका मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Mumbai Rains Updates heaviest rainfall was recorded between 11 pm on Saturday and 4 am on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.