Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:46 IST2025-05-21T13:46:07+5:302025-05-21T13:46:30+5:30
Mumbai Powai Tree Falls News: मुंबईत मंगळवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
मुंबईत काल (मंगळवारी, २१ जून २०२५) संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. याचदरम्यान, पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रशांत तोरणे (वय, ४५) आणि शोभा तोरणे (वय, ४०) अशी जमखींची नावे आहेत. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, पवईतील एसएम शेट्टी शाळेजवळ रात्री ८.०० वाजताच्या सुमारास झाड कोसळल्याने दोन जण गंभीर झाले. या घटनेत शोभा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
A tree collapsed near Jal Vayu Complex in Powai.@mybmcWardS@MumbaiPolice#Monsoon2025#powai#MumbaiRainspic.twitter.com/GKgfI8XPHh
— Chandivali Citizens Welfare Association (CCWA) (@ChandivaliCCWA) May 20, 2025
पावसामुळे मुंबईकरांचे हाल
मंगळवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी, दहिसर, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, साकी नाका आणि पवईसह अनेक परिसरात पाणी साचले. उपनगराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा अंधेरी सबवे बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागला.
हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
भारतीय हवामान विभागाने २४ मे पासून मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशीम, नागपूर, भंडारा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आले आहे.