Join us  

Mumbai Rain Updates : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर लाटांचं तांडव, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 9:29 AM

मुंबई शहरासह उपनगर आणि कोकणात आज अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

मुंबई - मुंबई शहरासह उपनगर आणि कोकणात येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र  विभागाने दिला आहे. 15 ते 18 जुलैदरम्यान उत्तर कोकणात अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. उत्तर कोकणात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश होता. 15 ते 18  जुलैदरम्यान दक्षिण कोकणात अतिवृष्टी होईल. 16 जुलै रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात अतिवृष्टी होईल.

दरम्यान, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर 4.97 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. परिणामी, पर्यटकांनी समुद्र किनारी जाणे टाळावे. मच्छीमारांनीही समुद्रात मासेमारीसाठी उतरू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.  

LIVE UPDATES

- दक्षिण मुंबईसह पश्चिम आणि पूर्व उपनगरांत जोरदार पावसाला सुरुवात

- मोठ-मोठ्या लाटांचा समुद्रकिनाऱ्याला तडाखा

- पर्यटक, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

- वसई, विरार, पालघरमध्ये जोरदार पावसाची हजेरी

 

 

 

 

 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमहाराष्ट्रकोकणपाऊस