Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Pune Expressway Traffic: पुण्याहून मुंबईला येणाऱ्या 'एक्स्प्रेस-वे'वर प्रचंड कोंडी, कधीपर्यंत सुरू होणार रस्ता? पोलिसांनी दिली मोठी अपडेट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:00 IST

Pune Mumbai Expressway Alternate Route: रसायन वाहून नेणाऱ्या टँकरला काल संध्याकाळी झालेल्या अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून, महामार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत.

Mumbai Pune Expressway Alternate Route: रसायन वाहून नेणाऱ्या टँकरला काल  संध्याकाळी झालेल्या अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून, महामार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. अपघातग्रस्त टँकरमधून ज्वालाग्राही वायूची गळती होत असल्याने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून, सुरक्षिततेसाठी मुंबईकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, आता पोलिसांनी ही वाहतूक कोंडी कधीपर्यंत कमी येईल? पर्यायी मार्ग कोणते आहेत? यावर मोठी अपडेट दिली आहे.

Mumbai Pune Expressway Traffic: टँकर उलटला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, २० ते २२ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवाशांचे हाल

दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीवर महामार्ग पोलीस अधिक्षक तानाजी चिखले यांनी अपडेट दिली. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली. "एक्स्प्रेसवेला आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपोलिन गॅसचा टँकर पलटी झाला आहे. त्या ठिकाणी गॅसच्या लिकेजचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. तर पुणे लेनची बाजू खालापूर टोल प्लाझापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे, तर पुण्याची बाजू दहा ते बारा किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे, अशी माहिती माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

"गॅस लिकेजचे प्रमाण पूर्ण बंद होईपर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. याकरता पुण्याहून मुंबईला जाणारी जी वाहतूक आहे ती जर ताम्हीणी घाट मार्गे तसेच इकडून कर्जतमार्गे वाहतूक सुरू केली तर त्याचा फायदा होणार असल्याचे सांगत त्यांनी या मार्गाचा वापर करण्यास सांगितले आहे. 

"अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच लवकरात लवकर टँकर बाजूला करण्याचे काम सुरू आहे, असंही महामार्ग पोलीस अधिक्षक तानाजी चिखले यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai-Pune Expressway gridlock after tanker accident; route closure update.

Web Summary : A tanker accident caused a major traffic jam on the Mumbai-Pune Expressway. A flammable gas leak forced the closure of the Mumbai-bound lane. Police advise using the Tamhini Ghat or Karjat routes as alternatives until the gas leak is contained and the tanker is removed.
टॅग्स :मुंबई-पुणे एक्सप्रेस वेपुणेवाहतूक पोलीसवाहतूक कोंडीलोणावळा