अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई आणि पुण्यादरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी व प्रवासवेळ अर्ध्या तासाने कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण 'मिसिंग लिंक' प्रकल्पाची कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०१८ मध्ये सुरू झाले होते. आता फिनिशिंगची कामे सुरू आहेत. ती महिनाभरात पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रदिनी १ मे रोजी हा मार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचे प्रयत्न एमएसआरडीसीने सुरू केले आहेत. हा मार्ग सुरू झाल्यावर लोणावळा घाटातील कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे.
हे अडथळे केले पार...
मोठ्या प्रमाणात उत्खननातील दगड व बोल्डर्सची विल्हेवाट, कामगारांसाठी ऑक्सिजन पुरवठा
विविध प्रकारच्या खडकांचे परीक्षण व योग्य उपाययोजना, बोगदा क्र. २ लोणावळा तलावापासून १८० मीटर खाली आहे. त्यामुळे त्याचे भुयारीकरण करताना ब्लास्टिंग आव्हानात्मक
डोंगराळ भागातील तीव्र चढउतार, खंडाळ्यातील घनदाट जंगल व मुसळधार पाऊस, उंचीवर काम करताना वाऱ्याचा दाब
केबल स्टेड पुलापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलातून पोहोच मार्ग बांधकाम, पुलासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे डिझाइन परदेशातून आणावे लागले.
पुलाच्या वादळ, टेन्सिल, स्टे केबल्स चाचण्या, तसेच धातू किंवा संरचनेची वारंवार ताणतणाव सहन करण्याची क्षमता तपासणाऱ्या चाचण्या परदेशात करण्यात आल्या. त्याला विलंब लागला.
मिसिंग लिंकमध्ये विशेष तंत्रज्ञान
वॉटर मिस्ट अग्निशमन यंत्रणा, स्काडा प्रणालीआधुनिक वाहतूक नियंत्रण यात व्हीएमएस, व्हीएसएलएस, एलसीएस प्रणालीचा वापरएसओएस व आपत्कालीन सुविधा, एएनपीआर कॅमेरेलिनिअर हीट डिटेक्शन सिस्टमव्हाइस ईव्हॅक्युएशन सिस्टम, व्हेंटिलेशन सिस्टम
बोगद्याची वैशिष्ट्ये
बोगदा क्रमांक १
१.६४ किमी लांबी, २३.५० मीटर रुंदी
बोगदा क्रमांक २
८.९२ किमी लांबी, २३.५० मीटर रुंदी
पुलांची खासियत
पूल १
९०० मीटर लांबी, ६० मीटर उंची
केबल स्टेड ब्रिज
६५० मीटर लांबी, १८४ मीटर उंची
प्रकल्प माहिती?
६६९५ कोटी खर्च, लांबी : १३.३ किमी
कोठून कुठपर्यंत : खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था)
सध्याचे अंतर : १९ किमीअंतर किती कमी होणार : ६ किमीवेळेची बचत : सुमारे २५ ते ३० मिनिटे
फायदे : लोणावळा घाटातील अपघातप्रवण क्षेत्र, तसेच तीव्र चढउतार टळणार, वाहतूक कोंडीतून सुटका होणार
केबल-स्टेड ब्रिजसाठी परदेशी डिझाइन आणि मॉडेल टेस्टिंगपुलाच्या १८० मीटर पायलॉनसाठी
१८० मीटर उंच पायलॉन (स्तंभ) बांधण्यासाठी 'डोका फॉर्मवर्क' या आधुनिक साच्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर
कॅन्टिलिव्हर ट्रॅव्हलरचा वापर, अत्यंत उच्च कार्यक्षम फायबरयुक्त काँक्रीटपासून बनवलेले गर्डर्स
काय होणार?
प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास व वेळेची बचत, घाटातील तीव्र वळणे टाळल्यामुळे अंतर कमी
अखंड वाहतूक प्रवाह, पथकर नाक्याच्या विस्तारामुळे वाहतूक कोंडी टाळणे शक्य
दररोज सुमारे १ कोटी रुपयांच्या इंधनाची बचत अपेक्षित, अपघातात घट होणार
मुंबई-लोणावळा/पुणे प्रवास सुलभ
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
जगातील सर्वांत रुंद २३.५ मीटरचा बोगदा, आशियातील सर्वाधिक उंचीचा पूल. उंची १८४ मीटर
पुलाची वाऱ्याचा वेग सहन करण्याच्या क्षमतेची 'विंड टनेल टेस्ट' डेन्मार्कमधील कोपेनहेगन येथे केली.
केबल स्टेड पुलाची वाऱ्याचा वेग सहन करण्याची क्षमता २५२ किमी प्रतितास
केबल स्टेड पुलाचा स्पॅन ३०५ मीटर लांबीचा, पुलाच्या पाहणीसाठी प्रथमच कायमस्वरूपी हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम उभारणार
Web Summary : The Mumbai-Pune Missing Link project nears completion, opening May 1st. Travel time reduces by 30 minutes, bypassing Lonavala traffic. The project features advanced technology and engineering, including wide tunnels and a high cable-stayed bridge, ensuring safer, faster travel and fuel savings.
Web Summary : मुंबई-पुणे मिसिंग लिंक परियोजना 1 मई को खुलने के करीब है। यात्रा का समय 30 मिनट कम हो जाएगा, जिससे लोनावाला ट्रैफिक से बचा जा सकेगा। इस परियोजना में उन्नत तकनीक और इंजीनियरिंग शामिल है, जिसमें चौड़ी सुरंगें और एक ऊंचा केबल-स्टे ब्रिज शामिल है, जो सुरक्षित, तेज यात्रा और ईंधन की बचत सुनिश्चित करता है।