मुंबई : मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये मालमत्ता विक्रीत ४६ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 06:53 PM2021-07-05T18:53:34+5:302021-07-05T18:54:09+5:30

Property Sell : जून महिन्यात मुंबईत ७,८४७ युनिट्सची झाली विक्री.

Mumbai Property sales up 46 percent in June compared to May post less covid 19 cases | मुंबई : मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये मालमत्ता विक्रीत ४६ टक्क्यांची वाढ

मुंबई : मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये मालमत्ता विक्रीत ४६ टक्क्यांची वाढ

Next
ठळक मुद्देजून महिन्यात मुंबईत ७,८४७ युनिट्सची झाली विक्री.

कोरोनाच्या काळात बांधकाम व्यवसायाला सर्वात मोठा फटका बसला होता. परंतु मुंबईत सध्या बांधकाम व्यवसाय सावरताना दिसत आहे. जून 2021 मध्ये मुंबईत 7,857 युनिट्सची मालमत्ता विक्री झाली. त्या तुलनेत मे 2021 मध्ये 5,360 युनिट्स विकल्या गेल्या असून ही वाढ 46 टक्के इतकी आहे. एप्रिलमध्ये मुंबईत 10136 युनिट्सची मालमत्ता विक्री झाली. जून 2021 मध्ये 42 टक्के नोंदणी महिन्यात संपलेल्या नवीन निवासी विक्रीतून झाली असून ही मे 2021 मध्ये 29 टक्के आणि एप्रिल 2021 मध्ये 7 टक्के या तुलनेत चांगली नोंद झाली आहे.

जून 2021 मध्ये मुद्रांक शुल्क संग्रह (Stamp Duty Collection) 420 कोटी रुपये होता. तर मे 2021 मध्ये 268 कोटी रुपये आणि एप्रिल 2021 मध्ये 514 कोटी रुपये होता. कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम आणि एप्रिल 2021 पासून महाराष्ट्र सरकारच्या मालमत्ता नोंदणीवरील मुद्रांक शुल्क माफी बंद करण्याच्या निर्णयामुळे एप्रिल आणि मे 2021 मध्ये मालमत्ता विक्रीत घट दिसून आली. तर जून 2021 मध्ये मागील महिन्याच्या तुलनेत आणि मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत चांगली विक्री दिसून आली.

"जरी जून 2021 च्या महिन्यात आम्ही मालमत्ता नोंदणीत मोठ्या प्रमाणात पुनर्प्राप्ती पाहिली असली तरी एप्रिल ते जून या तिमाहीत नोंदणीकृत विक्री ही मागील तिमाहीत नोंदणीच्या ओव्हरफ्लोमुळे आहे जेथे बर्‍याच घर खरेदीदारांनी मार्चच्या अंतिम मुदतीपूर्वी मुद्रांक शुल्काचा लाभ घेतला आणि त्यांची मालमत्ता नंतर नोंदविली. कमी व्याज दर, सवलतीची दरे व स्टॅम्प ड्यूटीतील कपात यामुळे घरांच्या मागणीत वाढ दिसून आली. आम्ही सरकारला मार्च 2022 पर्यंत मुद्रांक शुल्कावर फेरविचार व आणखी एका वर्षासाठी ते कमी करण्यास विनंती करत आहोत," अशी प्रतिक्रिया नरेडको महाराष्ट्रचे अध्यक्ष अशोक मोहनानी यांनी दिली. 

"शहरात हळूहळू अनलॉक केल्यामुळे आणि अर्थव्यवस्था उघडल्यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत जून 2021 मध्ये मालमत्ता विक्रीची संख्या सुधारली आहे. मुख्यत: राज्य सरकारने निर्बंध सुलभ केल्याने आणि लसीकरणाच्या गतीमुळे रिअल इस्टेटची काही प्रमणात पूर्वपदाकडे येण्यास मदत झाली आहे," अशी प्रतिक्रिया दि गार्डियन्स रिअल इस्टेट अ‍ॅडव्हायझरीचे कार्यकारी संचालक राम नाईक यांनी दिली.

Web Title: Mumbai Property sales up 46 percent in June compared to May post less covid 19 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.