मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 07:33 IST2025-11-09T07:30:40+5:302025-11-09T07:33:21+5:30
Manoj Jarange Patil News: आझाद मैदानात केलेल्या उपोषणादरम्यान आखून दिलेल्या अटींच्या कथित उल्लंघनाप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या पाच कार्यकर्त्यांना समन्स जारी केले आहे.

मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
मुंबई - आझाद मैदानात केलेल्या उपोषणादरम्यान आखून दिलेल्या अटींच्या कथित उल्लंघनाप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या पाच कार्यकर्त्यांना समन्स जारी केले आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. आझाद मैदान पोलिसांनी शनिवारी हे समन्स त्यांना जारी केले.
जरांगे यांना मुंबईत उपोषण करण्यासाठी जी अनुमती दिली होती, त्याकरिता त्यांना काही अटी व शर्ती आखून दिल्या होत्या. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या अटी व शर्तीचा भंग केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. त्याचकरिता चौकशी करण्यासाठी हे समन्स जारी करण्यात आले आहे. २ सप्टेंबर रोजी जरांगे यांनी आपले पाच दिवसांचे उपोषण सोडले होते.