Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:00 IST2025-12-31T17:59:40+5:302025-12-31T18:00:36+5:30
Sanjay Raut News: उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नाहूर येथील 'मैत्री' या बंगल्याबाहेर एका कारवर 'आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार', असा मजकूर लिहिण्यात आल्याने एकच खळबळ माजली.

Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नाहूर येथील 'मैत्री' या बंगल्याबाहेर एका कारवर आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार, असा मजकूर लिहिण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथक राऊतांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून संबंधित कार आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली जात आहे.
संजय राऊत यांच्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या एका कारवर कोणाचे तरी लक्ष गेले. या कारच्या काचेवर 'आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार' असा मजकूर लिहिलेला आढळला. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथक तातडीने नाहूर येथील घटनास्थळी दाखल झाले. खबरदारी म्हणून संजय राऊत यांच्या निवासस्थानाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
राऊतांच्या बंगल्याबाहेरील कार नेमकी कोणाची आहे? ही कार कधीपासून तिथे उभी आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच कारवरील मजकूर नेमका कोणी आणि कधी लिहिला? याचा तपास घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत