Mumbai Police: मुंबईत 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश, मोर्चा अन् ड्रोन उडवण्यासही बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 20:39 IST2022-03-17T20:30:37+5:302022-03-17T20:39:28+5:30
बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

Mumbai Police: मुंबईत 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश, मोर्चा अन् ड्रोन उडवण्यासही बंदी
मुंबई - राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर कायमच चर्चेत असतं. दहशतवादी असोत किंवा गुन्हेगारी असो किंवा मोर्चे, आंदोलनं असो हे शहर केंद्रस्थानी असते. त्यामुळेच, मुंबई शहरात नेहमीच मोठा बंदोबस्त तैनात असतो. पर्यटनाच्यादृष्टीनेही मुंबई पाहायला जगभरातून लोकं येतात. त्यामुळे, या शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हानच असते. तरीही, मुंबई पोलीस आपले परपूर्ण योगदान देत मुंबईचं स्पीरट कायम धावतं ठेवतात. त्यासाठी, अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. आता, मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. त्यानुसार ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडण्यास प्रतिबंध केल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले आहे.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ८ एप्रिलपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी घालण्यात आल्याचे आदेश पोलीस उपआयुक्तांनी जारी केले आहेत.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 17, 2022
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ८ एप्रिलपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी घालण्यात आल्याचे आदेश पोलीस उपआयुक्तांनी जारी केले आहेत.
दरम्यान, सध्या होळी, धुलीवंदन आणि नंतर रंगपंचमीचा सण साजरा होत आहे. त्यानंतर, गुढी पाडव्याचाही सण येतोय. मात्र, मुंबई शहरासाठी जमावबंदीचे आदेश काढण्यात आल्याने 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.