Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबईत पीयूष गोयल यांची मोठी आघाडी, तब्बल ७० हजार मतांनी पुढे 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 11:47 AM2024-06-04T11:47:00+5:302024-06-04T11:49:21+5:30

Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी तब्बल ७० हजाराहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे.

mumbai north lok sabha result 2024 piyush goyal leading vs bhushan patil maharashtra live result  | Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबईत पीयूष गोयल यांची मोठी आघाडी, तब्बल ७० हजार मतांनी पुढे 

Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबईत पीयूष गोयल यांची मोठी आघाडी, तब्बल ७० हजार मतांनी पुढे 

Mumbai North Lok Sabha Result 2024 : उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी तब्बल ७० हजाराहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या स्थानावर काँग्रेस भूषण पाटील यांना आतापर्यंत ६७ हजार १७७ मतं पडली आहेत. 

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ भाजपचा गड राहिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी चार लाखाहून अधिक मतांनी विजय प्राप्त केला होता. यावेळी भाजपाने पीयूष गोयल यांना या मतदार संघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. सुरुवातीच्या कलांमध्ये पीयूष गोयल यांनी मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या सर्व फेऱ्यांमध्ये पीयूष गोयल आघाडीवर कायम आहेत. त्यामुळे उर्वरित फेऱ्यांमध्ये भूषण पाटील यांच्याकडून गोयल यांची आघाडी मोडून काढणं जवळपास कठीण मानलं जात आहे. 

आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार गोयल यांना १ लाख ४३ हजार ७५८ मतं मिळाली आहेत. तर भूषण पाटील यांना ६९ हजार ६७५ मतं मिळाली आहेत. गोयल यांच्याकडे ७४,०८३ मतांची आघाडी आहे.

Web Title: mumbai north lok sabha result 2024 piyush goyal leading vs bhushan patil maharashtra live result 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.