मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील नर्सेसचा संप; जेवण, राहण्याच्या गैरसोयीनं वैतागल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 04:48 PM2021-05-10T16:48:03+5:302021-05-10T16:48:45+5:30

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड सेंटरमधील सुमारे २०० नर्सेस रविवारी संपावर गेल्या होत्या. निकृष्ट दर्जाचं जेवण आणि राहण्याची गैरसोय होत असल्यानं नर्सेसनं संप पुकारला होता.

Mumbai No proper food and accommodation nurses at Covid hospital go on flash strike | मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील नर्सेसचा संप; जेवण, राहण्याच्या गैरसोयीनं वैतागल्या!

मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील नर्सेसचा संप; जेवण, राहण्याच्या गैरसोयीनं वैतागल्या!

googlenewsNext

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड सेंटरमधील सुमारे २०० नर्सेस रविवारी संपावर गेल्या होत्या. निकृष्ट दर्जाचं जेवण आणि राहण्याची गैरसोय होत असल्यानं नर्सेसनं संप पुकारला होता. कोविड सेंटरच्या व्यवस्थापकानं नर्सेसच्या सर्व मागण्या लेखी हमी देऊन मान्य केल्यानंतर दुपारी ३ वाजता सर्व नर्सेस पुन्हा कामावर रुजू झाल्या आहेत. (Mumbai No proper food and accommodation nurses at Covid hospital go on flash strike)

नेस्कोच्या कोविड सेंटरबाहेर रविवारी सर्व नर्सेस एकत्र जमा झाल्या होत्या आणि प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला. कोविड सेंटरमध्ये त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं जात असून अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची तक्रार नर्सेसनं केली. नेस्को कोविड सेंटरमध्ये काम करत असलेल्या नर्सेस गेल्या वर्षभरापासून जवळच असलेल्या म्हाडा वसाहतीमध्ये राहत आहेत. त्यानंतर त्यांना दिंडोशीच्या एका शाळेमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. याच मुद्द्यावर नर्सेसनं नाराजी व्यक्त केली आहे. दिंडोशी भागात राहण्याची आणि जेवणाची हयगय होत असल्याची तक्रार नर्सेसनं केली होती. याशिवाय कोविड सेंटर ते दिंडोशी असा एका लहान बसमध्ये कोंबून प्रवास करावा लागत असल्याचंही म्हटलं होतं. 

अखेर सर्व नर्सेसचा रविवारी उद्रेक झाला आणि जवळपास २०० नर्सेसनं संप करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नेस्को सेंटरमधील कोरोना रुग्णांची काही तास गैरसोय झाली होती. अखेर नेस्को सेंटरच्या व्यवस्थापकानं सर्व मागण्या लेखी मान्य केल्यानंतर नर्स पुन्हा कामावर रुजू झाल्या आहेत. गोरेगावच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये काम करत असलेल्या नर्स या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून कामासाठी मुंबईत आल्या आहेत. यात धुळे, रत्नागिरी, नंदुरबार, बीड, अहमदनगर अशा जिल्ह्यांतून अनेक नर्सेस आल्या आहेत. 
 

Web Title: Mumbai No proper food and accommodation nurses at Covid hospital go on flash strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.