BMC Budget 2026: मुंबई महानगरपालिका ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, समोर येतंय ‘असं’ कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:48 IST2026-02-25T16:47:59+5:302026-02-25T16:48:50+5:30
Mumbai Municipal Corporation Budget: नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विविध बँक खात्यांमध्ये असलेल्या हजारो कोटींच्या ठेवी हा प्रचारातील प्रमुख मुद्दा ठरला होता. दरम्यान, आता निवडणुका आटोपून मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर या ठेवींबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

BMC Budget 2026: मुंबई महानगरपालिका ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, समोर येतंय ‘असं’ कारण
BMC Budget 2026: नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विविध बँक खात्यांमध्ये असलेल्या हजारो कोटींच्या ठेवी हा प्रचारातील प्रमुख मुद्दा ठरला होता. दरम्यान, आता निवडणुका आटोपून मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर या ठेवींबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता मुंबई महानगरपालिकेच्या ८१ हजार कोटी रुपयांच्या ठेवींपैकी सुमारे ३६ हजार कोटी रुपयांच्या ठेवी ह्या विकासकामांसाठी मोडण्यात येणार आहेत. दरम्यान, मुंबई महानगपालिकेने घेतलेल्या या निर्णयाविरोधात पालिकेतील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या उद्धवसेनेसह इतर विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत मुंबई महानगपालिकेच्या विविध बँकांमध्ये सुमारे ८१ हजार ४४९ कोटी ३२ रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवींपैकी ३६ हजार ६२३ कोटी रुपयांच्या ठेवी ह्या पुढील वर्षभरात मुंबईत विविध विकासकामे करण्यासाठी मोडण्यात येणार आहेत. आज सादर करण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आल्यास मागच्या अनेक वर्षांपासून उभ्या केलेल्या हजारो कोटींच्या ठेवी मोडल्या जातील असा दावा उद्धवसेनेकडून वारंवार कऱण्यात येत होता. आता आज झालेल्या या निर्णयामुळे तेव्हा उद्धवसेनेने केलेला दावा खरा ठरला आहे.
