मुंबई मनपा ‘एन’ वॉर्ड; असंख्य समस्यांचा विळखा असलेला विभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:30 AM2024-01-10T10:30:55+5:302024-01-10T10:32:45+5:30

मेट्रोची पूर्व व पश्चिम उपनगराला जोडणारी ब्ल्यू लाइन-१ जोडण्याचा मान घाटकोपरला मिळाल्याने या ठिकाणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Mumbai municipal corporation n ward a section riddled with numerous problems | मुंबई मनपा ‘एन’ वॉर्ड; असंख्य समस्यांचा विळखा असलेला विभाग

मुंबई मनपा ‘एन’ वॉर्ड; असंख्य समस्यांचा विळखा असलेला विभाग

मुंबईमेट्रोची पूर्व व पश्चिम उपनगराला जोडणारी ब्ल्यू लाइन-१ जोडण्याचा मान घाटकोपरला मिळाल्याने या ठिकाणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. गोणपाटाच्या झोपड्यांपासून ते आलिशान ड्युप्लेक्स फ्लॅट्सची रेलचेल असणारा विभाग म्हणजे ‘एन- वॉर्ड’!  वर्सोवा ते अंधेरी मुंबईतील पहिली मेट्रो येथून धावत असल्याने घाटकोपर स्थानक अत्यंत गर्दी व सतत व्यस्त असलेले स्थानक आहे. मेट्रोच्या दृष्टीने प्रगतशील असलेल्या ‘एन’ वॉर्डमध्ये तितकीच सुधारणा होणेही आवश्यक आहे. झोपडपट्ट्या, पुनर्विकास, पावसाळ्यात पाणी तुंबणे, पाण्याची समस्या अशा असंख्य समस्यांचा या वॉर्डला विळखा आहे.

हद्द-पूर्व-पश्चिम :

पूर्व हद्द : ठाणे खाडी
पश्चिम हद्द : नेताजी पालकर मार्ग, खलाई गाव
उत्तर हद्द : वर्षानगरचा शेवटपासून गोदरेज कंपनीची पश्चिम हद्द
दक्षिण हद्द : घाटकोपर पम्पिंग स्टेशन

वॉर्डाचे वैशिष्ट्य :

पूर्व हद्द : ठाणे खाडी
पश्चिम हद्द : नेताजी पालकर मार्ग, खलाई गाव
उत्तर हद्द : वर्षानगरचा शेवटपासून गोदरेज कंपनीची पश्चिम हद्द
दक्षिण हद्द : घाटकोपर पम्पिंग स्टेशन

मुख्य समस्या :

 पावसाळ्यात पाणी तुंबणे, हिल भागात भूस्खलन होणे, पाणी, अरुंद रस्ते, वाहतूककोंडी, येथील झोपडपट्ट्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.

 घाटकोपर आणि काहीसा विक्रोळीचा भाग कवेत घेणाऱ्या या वॉर्डात एक फेरफटका मारला तर यातून दोन समस्या पुढे येतात, त्या म्हणजे पाण्याची टंचाई, अतिक्रमणांची वाळवी. बाकी ट्रॅफिक, कचरा, अरुंद रस्ते, आरोग्य सेवेचा अभाव अशा समस्या इथेही ठाण मांडून आहेतच. 


महापालिका प्रभाग माजी नगरसेवक :

 रूपाली आवेळ : वॉर्ड क्र.१२५
अर्चना भालेराव : वॉर्ड क्र.१२६
तुकाराम पाटील : वॉर्ड क्र.१२७
अश्विनी हंडे : वॉर्ड क्र.१२८
सूर्यकांत गवळी : वॉर्ड क्र.१२९
बिंदू त्रिवेदी : वॉर्ड क्र.१३०
राखी जाधव : वॉर्ड क्र.१३१
पराग शहा : वॉर्ड क्र.१३२
परमेश्वर कदम : वॉर्ड क्र.१३३

सहायक आयुक्त - गजानन बेल्लाळे : ‘एन’ वॉर्डमधील बहुतांशी भागात झोपडपट्टी असल्याने पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असू. फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांची तक्रार दूर होईल. घाटकोपरचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

शैक्षणिक संस्था : सोमय्या कॉलेज, झुनझुनवाला कॉलेज

पर्यटन स्थळे : कामगार नेते दत्ताजी साळवी मैदान, जनरल अरुणकुमार मैदान, माता रमाबाई आंबेडकर उद्यान

रुग्णालये : रमाबाई ठाकरे मॅटर्निटी होम, राजावाडी हॉस्पिटल, 
संत मुक्ताबाई हॉस्पिटल 

Read in English

Web Title: Mumbai municipal corporation n ward a section riddled with numerous problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.