स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 20:23 IST2025-12-26T20:21:11+5:302025-12-26T20:23:03+5:30
Mumbai Municipal Corporation Election: उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि नेते गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. आज काँग्रेसचे माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांना आज उद्धवसेनेत प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला

स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची उद्धवसेना आणि राज ठाकरेंची मनसे हे पक्ष एकत्र लढणार आहेत. तर काँग्रेस या निवडणुकीला स्वबळावर सामोरा जाणार आहे हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि नेते गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. आज काँग्रेसचे माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांना आज उद्धवसेनेत प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
चंगेज मुलतानी हे जोगेश्वरी पश्चिम भागातील काँग्रेसचे नगरसेवक होते. मुलतानी यांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेत उद्धवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी चंगेज मुलतानी यांच्या हातात शिवबंधन बांधत त्यांना उद्धवसेनेत प्रवेश दिला.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धवसेना आणि मनसे यांच्यातील युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. युतीबाबत एकमत झालं असलं तरी उद्धवसेना आणि मनसे नेमक्या किती जागांवर लढणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही.